शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दारु बंदी : स्वाक्षरींच्या पडताळणीसाठी महिलांची गर्दी

By admin | Updated: July 9, 2017 14:38 IST

येथील परशुराम नाईक विद्यालयात संबंधित महसूल व उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने पडताळणी होत आहे.

बोरगाव मंजू (अकोला) : गावातील देशी दारु दुकाने बंद करण्यासाठी बोरगावमंजू येथील महिला व संघर्ष समितीने आंदोलन छेडले आहे. एकूण महिला मतदार संख्या ५,९४४ एवढी असून, दारुबंदीकरिता मतदान घेण्यात यावे, याकरिता ४,५00 महिलांनी निवेदनावर सह्या करून वरिष्ठांना निवेदन दिले होते. नियमाप्रमाणे २५ टक्के महिलांच्या सह्यांची पडताळणी करणे क्रमप्राप्त असल्याने ९ जुलै, रविवारी येथील परशुराम नाईक विद्यालयात संबंधित महसूल व उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने पडताळणी होत आहे. २५ टक्के महिलांच्या सह्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी महिलांची मोठी झुंबड उडाली आहे. दारू दुकान बंद झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निश्‍चय महिलांनी केला आहे.महामार्गावरील न्यायालयाच्या आदेशाने बंद झालेले मद्यविक्रीचे दुकान शहरात स्थानांतरित करू नये,अशी मागणी बोरगाव मंजू येथील महिला व ग्रामस्थांनी केली होती, तसेच या दुकानांचा विरोध करूनही संबंधित विभागाने नव्याने मद्यविक्री दुकाने स्थानांतरित करण्याकरिता परवानगी दिली. त्यामुळे, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दुकाने बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. तेव्हा ५0 टक्के महिलांनी दारुबंदी विरोधात मतदान केल्यास ही दुकाने कायमची बंद होतील, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. दरम्यान, २९ जून रोजी ४,५00 महिलांच्या सह्यांचे निवेदन देऊन प्रत्यक्ष मतदान घ्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, दारू उत्पादन शुल्क अधिकारी यांच्याकडे केली होती.