शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अकोटातील काँग्रेस नगरसेवकाच्या जुगार अड्ड्यावर छापा

By admin | Updated: April 20, 2017 01:54 IST

चार जणांना अटक, १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला : अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकळी फाट्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पोलीस पथकाने छापा घालून जुगार खेळणाऱ्या चार जणांना अटक केली. ही कारवाई बुधवारी रात्रीदरम्यान करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. अकोटातील एका काँग्रेस नगरसेवकाचा हा जुगार अड्डा असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पोलीस पथकाला अकोट तालुक्यातील सुकळी फाट्यावर वरली जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. विशेष पोलीस पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पथकास जुगार अड्ड्यावर छापा घातला. यावेळी दहा ते बारा जण जुगार खेळत होते; परंतु पोलिसांना पाहून अनेकांनी मिळेल त्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. त्यापैकी पोलिसांनी सलीम शाह इब्राहिम शाह (३३ रा. काठीपुरा अंजनगाव सुर्जी), सैयद काजिम सैयद नाजिम (२८ रा. इत्तेगार प्लॉट अकोट), अक्रम शाह अन्वर शाह (२४ रा. अलिमपुरा अकोट) आणि मजर अली सैयद मुकद्दर (४० रा. खतिफपुरा अकोट) यांना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी मोबाइल, त्यांच्या मोटारसायकल आणि रोख असा एकूण १ लाख ७७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सुकळी फाट्यावरील जुगार अड्डा हा अकोटातील एका काँग्रेस नगरसेवकाचा असल्याचे समजते. अकोट ग्रामीण पोलिसांनीसुद्धा या माहितीला दूजोरा दिला आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृतरित्या माहिती दिली नाही. विशेष पोलीस पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाइल बंद होता. जुगार खेळणाऱ्यास अटक अकोला : जुने शहरातील महाकाली नगरात सट्टापट्टीचा जुगार खेळताना पोलिसांनी संजय विठ्ठलराव घुगे (रा. शिवसेना वसाहत) याला अटक केली. त्याच्याकडून चिठ्ठ्या व १२५० रुपये रोख जप्त केले.