शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
3
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
4
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
5
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
6
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
7
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
8
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
9
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
10
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
11
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
12
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
13
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
14
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
15
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
16
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
17
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
18
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
19
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला

अकोटात शेतकरी आक्रमक

By admin | Updated: June 4, 2017 05:12 IST

शिवरायाला दुग्धाभिषेक : रस्त्यावर दूध ओतले, भाजीपाला फेकला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोटातील शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले असून ३ जून रोजी शेतकरी व दूध उत्पादकांनी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला, तसेच रस्त्यावर भाजीपाला फेकून सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. या प्रकारामुळे संपूर्ण रस्त्यावर दुधाचे पाट वाहू लागले. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दूध उत्पादकांना २४ रुपये एवढा कमी भाव मिळत असल्याने दूध उत्पादकांसमोर संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने तसेच शेतीपूरक व्यवसाय असलेला पशुपालन व्यवसायसुद्धा धोक्यात आला आहे. या सर्व प्रकाराचा निषेध म्हणून स्थानिक शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला, तसेच रस्त्यावर दूध ओतण्यात आले. शिवाय, भाजीपाला रस्त्यावर फेकण्यात आला. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने म्हशीच्या दुधाला ५० रुपये व गाईच्या दुधाला ४० रुपये भाव द्यावा, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, दुधाळ जनावरांचे खाद्य मार्केट अंतर्गत देण्यात येऊ नये, शासनाने पशुधन विमा योजना पुन्हा सुरू करावी, बिनव्याजी कर्ज पुरवठा करावा, शेतीसाठी अखंड मोफत वीज पुरवठा व ठिबक, तुषार सिंचनाला अनुदान मिळावा आदी मागण्यांकरिता आंदोलन छेडण्यात आले.यावेळी तुषार पुंडकर, नानासाहेब भिसे, निखिल गावंडे, विशाल भगत, कुलदीप वसू, तुषार पाचकोर, कपिल ढोके, आनंद साबळे, अभिजित भिसे, रवींद्र डोबाळे, मधू लोखंडे, मुन्ना साबळे, श्रीयश चौधरी, सागर उकंडे, बजरंग मिसळे, संभाजी थोरात, रवी पवार, अवी घायसुंदर, विशाल चौधरी, आशिष गीते, आशिष पुंडकर, रोहित पुंडकर, निनाद मानकर, रोहित पितांबरवाले, प्रफुल्ल बोरकुटे, जयेश भिसे, उमेश ठाकूर, ओमप्रकाश हाडोळे, सोपान साबळे, दत्ता सिरसाट, ज्ञानेश्वर साबळे, विष्णू खडसे, प्रवीण वैराळे, उद्धव साबळे, जयंत रेळे, रफत अली, जुबेर अली, जमीर, तुकाराम भाकरे, ज्ञानेश्वर साबळे, उत्तम शनवारे, ज्ञानेश्वर बावस्कार, पप्पू महाजन, रजनीश पटेल, अजय पटेल आदींसह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज अकोट "आठवडी बाजार बंद"चा निर्धार आपल्या विविध मागण्यांकरिता शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपात शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन रविवारी अकोट येथे भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटना व भाजीपाला असोसिएशनने केला आहे. शहरातील भाजीपाल्याच्या अडत व शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता बाजार भरविण्यात येऊ नये, याकरिता उशिरा रात्रीपर्यंत शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख, तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार, अकोट तालुका प्रमुख प्रफुल्ल बदरखे, युवा आघाडी प्रमुख विक्रांत बोंद्रे, गजानन बोरोकार व्यापारी, अडत्यांना भेटून सहभागी होण्याचे आवाहन करीत होते. शेतकऱ्यांनी केले मुलांना दूध वाटप स्थानिक शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक करण्यात आला, तर रस्त्यावर दूध फेकण्यात आले. यावेळी आंदोलनात असलेल्या काही शेतकऱ्यांनी आपल्या कॅनमधील दूध या ठिकाणी असलेल्या गोरगरीब मुलांना वाटप केले. शेतकरी जितक्या तीव्रतेने आंदोलन करतात, तितक्याच हळव्या मनाने संवेदनशीलतेचा परिचय देतात.