लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट - खंडवा रेल्वे मीटर गेजच्या ब्रॉडगेज रूपांतराचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राजस्थानमधील सिकर - चुरू रेल्वे मार्गाच्या धर्तीवर अकोट-खंडवाचे काम मार्गी लावण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.१६ डिसेंबर २0१७ रोजी ना. गडकरी, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित गांधीग्राम येथील कार्यक्रमात खा. धोत्रे यांनी अकोट - खांडवा ब्रॉडगेजचे काम वन व पर्यावरण विभागाच्या हरकतीमुळे प्रलंबित असल्याचे सांगितले होते. त्याची आठवण ठेवून या बैठकीत गडकरी यांनी प्रलंबित कामाला गती दिली आहे. ना.गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंत्री पीयूष गोयल, डॉ. हर्षवर्धन, गजेन्द्रसिंह शेखावत आदींच्या उपस्थित रेल्वे, वन, पर्यावरण, रस्ते विभागाच्या ज्येष्ठ मंत्री व राज्यमंत्री तसेच संबंधित विभागाचे सचिव, अवर सचिव आणि खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत अकोला - अकोट व आमला खुर्द खांडवा रेल्वे लाइनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होणार असून निर्धारित वेळेपेक्षा सहा महिने आधी काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली.
अकोट-खंडवा रेल्वे ब्रॉडगेजचे काम लवकरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:55 IST
अकोला : अकोट - खंडवा रेल्वे मीटर गेजच्या ब्रॉडगेज रूपांतराचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राजस्थानमधील सिकर - चुरू रेल्वे मार्गाच्या धर्तीवर अकोट-खंडवाचे काम मार्गी लावण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.
अकोट-खंडवा रेल्वे ब्रॉडगेजचे काम लवकरच!
ठळक मुद्देगडकरी यांच्या पुढाकारात झाली बैठक खा. धोत्रे यांच्या प्रयत्नाला यश