शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोट-अकोला रस्ता कामाच्या मुद्यावर कार्यकारी अभियंत्यास धरले धारेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 13:18 IST

जिल्ह्यातील रस्ते व उड्डाणपुलाच्या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

अकोला: केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला. त्यामध्ये अकोला-अकोट-तेल्हारा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खोदून ठेवलेल्या रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, अशी विचारणा करीत, या मुद्यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यास चांगलेच धारेवर धरले. त्यानुषंगाने जिल्ह्यातील रस्ते व उड्डाणपुलाच्या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.या बैठकीला महापौर अर्चना मसने, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अकोला-अकोट-तेल्हारा या रस्त्याच्या कामासाठी गत दोन-अडीच वर्षांपासून रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे; मात्र रस्त्याचे काम अद्याप पूर्ण करण्यात आले नसल्याने, या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांचे हाल होत असून, रस्त्याचे काम केव्हा पूर्ण करण्यात येणार, असा प्रश्न आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी बैठकीत उपस्थित केला. या मुद्यावर आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे यांनी संताप व्यक्त करीत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे यांना चांगलेच धारेवर धरले. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न करणाºया कंत्राटारावर कारवाई करण्याची मागणीही लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. रस्ता कामासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाºया वाहनांवर वन विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आल्याच्या मुद्यावरही लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अकोला विमानतळ विस्तारीकरण, जिल्ह्यातील रस्ते कामांची सद्यस्थिती व अकोला शहरात सुरू असलेल्या उड्डाणपूल कामाचा आढावा घेत, रस्ते आणि उड्डाणपुलाच्या कामांना गती देऊन पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील टेलिफोन सेवा कंपन्यांच्या कामासह सुपर स्पेशालिटी कामाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे