शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांच्या मालमत्ता करात ८० टक्के करवाढ

By admin | Updated: April 4, 2017 01:17 IST

उत्पन्नवाढीसाठी महापालिकेचा निर्णय : पंधरा वर्षांपूर्वी ६० टक्के दरवाढ; वाणिज्यसाठी १२५ टक्क्यांनी वाढ

अकोला: महापालिकेच्या उत्पन्नाची तूट भरून काढण्यासाठी तसेच शहर विकासाच्या योजनांमध्ये आर्थिक हिस्सा जमा करण्यासाठी बाजार मूल्यानुसार अक ोलेकरांच्या मालमत्ता करात ८० टक्क्यांनी करवाढ करण्याचा निर्णय मनपाच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी घेण्यात आला. पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच २००२ मध्ये मालमत्ता कर विभागाने ६० टक्क्यांनी करवाढ केली होती. तेव्हापासून दर चार वर्षांनी केल्या जाणाऱ्या मालमत्ता पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला खो देण्यात आल्याने सुधारित करवाढ होऊ शकली नाही. महापालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेला नवीन भाग वगळून शहरातील निवासी, वाणिज्य व औद्योगिक वापरासाठी असलेल्या मालमत्तांवर सुधारित कर प्रणाली लागू करण्यावर प्रशासनाने आज शिक्कामोर्तब केले. मनपाच्या मुख्य सभागृहात आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेत नगर रचना विभाग तसेच मालमत्ता कर विभागाने मालमत्ता कराच्या मागणीत ८० टक्के वाढ प्रस्तावित केली. तसा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने उपायुक्त समाधान सोळंके यांनी सादर केला. मालमत्ता कर विभागाच्या दप्तरी ७४ हजार मालमत्ताधारकांची नोंद होती. त्यापासून अवघे १६ ते १८ कोटी रुपये वार्षिक कर वसुली होत असल्याने व ही रक्कम अतिशय तोकडी असल्यामुळे प्रशासनाने नोव्हेंबर २०१६ मध्ये ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे शहरातील मालमत्तांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. स्थापत्य कन्सलटन्सीला मालमत्तांचे सर्वेक्षण व संगणकीकृत नोंदी करण्याचे काम देण्यात आल्याची माहिती उपायुक्त सोळंके यांनी दिली. कंपनीच्या सर्व्हेनुसार नवीन प्रभाग वगळून शहरात १ लाख ५ हजाराच्या आसपास मालमत्तांची नोंद करण्यात आली आहे. मालमत्तांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यांच्या मोजमापाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यापैकी ७४ हजार मालमत्तांचे दस्तावेज उपलब्ध झाले असून त्यांच्या नोंदी केल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या तसेच शासनाच्या विविध योजनांमध्ये मनपाचा आर्थिक हिस्सा जमा क रण्यासाठी भांडवली नव्हे तर बाजार मूल्यानुसार कर आकारणी करणे गरजेचे असल्याचे उपायुक्त समाधान सोळंके यांनी सभागृहाला सांगितले. शहर हितासाठी करवाढ गरजेचे असल्याचे सांगत महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाचा प्रस्ताव मंजूर केला. यावेळी उपमहापौर वैशाली शेळके, मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.