शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांना आवडतो चिवचिवाट...दाणापाण्याची केली व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:17 IST

अकाेला : निसर्गकट्टा, प्राणिशास्त्र विभाग, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला व महात्मा फुले महाविद्यालय पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यासाठी ...

अकाेला : निसर्गकट्टा, प्राणिशास्त्र विभाग, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला व महात्मा फुले महाविद्यालय पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यासाठी ऑनलाईन चिमणी गणना आयोजित करण्यात आली होती. या गणनेत ६९० लोकांनी सहभाग नोंदविला होता. या गणनेत ७ प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नाच्या अनुषंगाने नागरिकांची मते जाणून घेतली. या सर्व्हेमध्ये सहभागी ८९ टक्के लाेकांनी चिमण्यांसाठी घरासमाेर पाण्याचे भांडे ठेवल्याचे समाेर आले असून ८२ टक्के लाेकांनी दाण्यांची व्यवस्था केल्याचे स्पष्ट झाले आहे

या सर्व्हेबाबत अधिक माहिती देताना निसर्गकट्टाचे अमोल सावंत यांनी सांगितले की, अकोल्याला जिल्ह्यातील चिमण्यांची स्थिती काय आहे व त्यांच्या संवर्धनासाठी काय उपाय करावे, यासाठी या सर्व्हेचे आयोजन करण्यात आले होते. फक्त चिमण्यांची संख्याची आकडेवारी न काढता चिमणी संवर्धनासाठी किती लोक जागरूक आहे हे पाहणे हा या सर्व्हेचा मुख्य उद्देश होता. पहिल्या वर्षी जरी आम्हाला कमी प्रतिसाद मिळाला पण दरवर्षी हा उपक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांना या चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

या चिमणी गणनेला डॉ. मिलिंद शिरभाते, सहप्राध्यापक, प्राणिशास्त्र विभाग, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय व डॉ. अमृता शिरभाते, प्राणिशास्त्र विभाग, महात्मा फुले महाविद्यालय पातूर यांचे विशेष सहकार्य लाभले.

काेट

या सर्व्हेमध्ये ज्या लोकांनी कृत्रिम घरटे लावण्याची इच्छा दर्शविली आहे त्यांना आम्ही घरटे उपलब्ध करून देणार आहोत. चिमणी वाचली पाहिजे, वावरली पाहिजे यासाठी अकाेलेकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

अमाेल सावंत, पक्षिप्रेमी निसर्गकट्टा

अकोल्यातील परिसरात ५ ते १० चिमण्या दिसण्याचे प्रमाण ३३.९% , १० ते २० चिमण्या दिसण्याचे प्रमाण ३८%, ५० ते १०० चिमण्या दिसण्याचे प्रमाण २२.२% तर चिमण्या न दिसण्याचे प्रमाण ५.९% आहे.

अकोला जिल्ह्यात १२ महिने चिमण्या दिसण्याचे प्रमाण ४२% आहे, उन्हाळ्यात २४.१%, पावसाळ्यात १३.३% व हिवाळ्यात २०.६% चिमण्या दिसतात.

सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी ८९.७% लोकांनी आपल्या अंगणात चिमण्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवले आहे.

तर ८२.३% लोकांनी चिऊताईसाठी अन्नाची व्यवस्था केली आहे.

७२.५% लोकांनी चिमणीसाठी कृत्रिम घरटे लावले आहेत. तर ९५.४% लोकांनी त्यांच्या परिसरात चिमण्यांसाठी हक्काचा निवारा म्हणेज कृत्रिम घरटे लावण्याची मागणी केली आहे. तर फक्त 5% लोकांनी कृत्रिम घरटे लावण्यास नकार दिला आहे.

३८.४% भागांमध्ये मोबाईल टॉवरच्या जवळपास चिमण्या राहतात तर ६१.६% भागांमध्ये चिमण्या आहेत त्या भागात मोबाईल टॉवर नाही.