शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

‘स्वरानंदवन’मुळे अकोलेकरांची संध्याकाळ सूरमय

By admin | Updated: December 22, 2014 01:06 IST

आनंदवनातील आदिवासी बांधवांनी सादर केली भन्नाट गीत.

अकोला : सर्मपण प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित स्वरानंदवन हा बाबा आमटे यांच्या आनंदवनातील आदिवासी बांधवांचा सूरमयी संगीत कार्यक्रम रविवार, २१ डिसेंबर रोजी सायंकाळी खुले नाट्यगृहात जल्लोषात पार पडला. कार्यक्रमात आनंदवनातील अंध, अपंग आणि कुष्ठरोगमुक्त कलाकारांनी विविध चित्रपट गीते सादर करून अकोलेकर रसिक श्रोत्यांची मने जिंकली. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पार पडलेल्या स्वागत समारोहाप्रसंगी ह्यस्वरानंदवनह्णचे निर्माते डॉ. विकास आमटे, महापौर उज्ज्वला देशमुख, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष कोरपे, अमरावती येथील समाजकार्य महाविद्यालयाचे दिलीप काळे, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे, जयप्रकाश पाटील, सुभाष भिरड, नंदकिशोर पाटील, सचिन बुरघाटे व सर्मपण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. विकास आमटे यांनी कार्यक्रमाची संकल्पना आणि उद्देश विशद करून, अकोलेकरांना आनंदवनाला भेट देण्याचे निमंत्रण दिले. यावेळी महापौर देशमुख व संतोष कोरपे यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर पार पडलेल्या मुख्य सूरमयी संगीत कार्यक्रमात उत्कृष्ट वाद्य वृंदाच्या साथीने आनंदवनातील अंध, अपंग आणि कुष्ठरोगमुक्त कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपटातील विविध गीते सादर केली. एकापेक्षा एक गीत सादर करून कलाकारांनी अकोलेकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी डॉ. विकास आमटे यांनी स्वत: हम होंगे कामयाब. हे गीत सादर करून श्रोत्यांच्या मनात आत्मविश्‍वस जागृत केला. श्रोत्यांनीदेखील त्यास भरभरून प्रतिसाद दिला.