शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांनो, ‘स्क्रब टायफस’पासून राहा सावध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:20 IST

पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात झुडपांचे प्रमाण वाढते. याच दिवसांत गवत, झुडपांमध्ये किटकांचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे या दिवसांत किटकांपासून ...

पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात झुडपांचे प्रमाण वाढते. याच दिवसांत गवत, झुडपांमध्ये किटकांचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे या दिवसांत किटकांपासून होणाऱ्या स्क्रब टायफसचादेखील धोका वाढलेला असतो. गवतावरील चिगर माइट कीटक चावल्याने ‘ओरिएन्टा सुसुगामुशी’ नावाचे जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ‘स्क्रब टायफस’ हा आजार होतो. विदर्भात नागपूर जिल्ह्यात स्क्रब टायफसची एंट्री झाली असून, मागील काही दिवसांत सुमारे सात रुग्ण आढळल्याची माहिती आहे. त्यामुळे वेळीच खबरदारी घेत अकोलेकरांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

२०१८ मध्ये विदर्भात घातला होता धुमाकूळ

तीन वर्षांपूर्वी विदर्भात स्क्रब टायफसच्या रुग्णांची लक्षणीय संख्या आढळून आली होती. गवत किंवा झुडपात आढळणारे ट्रॉम्बिक्युलीड माइटचे लारव्हे म्हणजेच पिसवा, चिगर किंवा सूक्ष्म कीटक चावल्यामुळे ‘ओरिएन्टा सुसुगामुशी’ नावाचे जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात व स्क्रब टायफसची लागण होते.

ही आहेत सामान्य लक्षणे

सूक्ष्म कीटक चावल्यानंतर सुमारे पाच ते वीस दिवसांत या आजाराची लक्षणे दिसतात.

सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे, मळमळ, उलटी आदी लक्षणे दिसतात.

त्यामुळे अनेक रुग्णांमध्ये मलेरिया किंवा डेंग्यूची शक्यता वर्तवली जाते.

चिगर ज्या ठिकाणी चावतो, तेथे एक व्रण दिसतो.

डीडीटी पावडरची फवारणी आवश्यक

पावसाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात अनेक भागात गवत आणि झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे विविध आजाराला कारणीभूत असलेल्या कीटकांचाही धोका वाढला आहे. हा धोका टाळण्यासाठी गवत आणि झुडपांवर डीडीटी पावडरची फवारणी करण्याची गरज आहे.