शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांनो, ‘स्वच्छता अँप’चा वापर करा - मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:22 IST

अकोला : केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून मनपा क्षेत्राला हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश दिले. शहरातील स्वच्छता व शौचालयांच्या बांधणीची राज्य शासनाच्या चमूने तपासणी करून शहराला हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर आता जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात शहरात नव्याने ‘स्वच्छ  सर्वेक्षण’ मोहीम राबवल्या जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी मनपाने ‘स्वच्छता अँप’ तयार केले असून, या अँपचा वापर करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. 

ठळक मुद्देजानेवारी व फेब्रुवारी महिन्यात शहरात नव्याने ‘स्वच्छ  सर्वेक्षण’ मोहीम राबवल्या जाणारमोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी मनपाने ‘स्वच्छता अँप’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून मनपा क्षेत्राला हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश दिले. शहरातील स्वच्छता व शौचालयांच्या बांधणीची राज्य शासनाच्या चमूने तपासणी करून शहराला हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर आता जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात शहरात नव्याने ‘स्वच्छ  सर्वेक्षण’ मोहीम राबवल्या जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी मनपाने ‘स्वच्छता अँप’ तयार केले असून, या अँपचा वापर करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानच्या माध्यमातून शहरी भागाला हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या घरी शौचालय नाही, त्यांचा शोध घेऊन त्यांना मनपा प्रशासनाच्या स्तरावर शौचालय बांधून देण्यात आले. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला. मोहिमेचा उद्देश सफल झाला की नाही, हे तपासण्यासाठी राज्य शासनाच्या चमूने अकोला शहराची तपासणी केली. त्यानंतर शहर हगणदरीमुक्त  झाल्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता जानेवारी व फेब्रुवारी २0१८ मध्ये शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने शासनाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २0१८’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली. 

‘स्वच्छता अँप’मुळे तक्रारींचा निपटारा!शहरातील बाजारपेठ, घरालगतचा परिसर, सर्व्हिस लाइन, सार्वजनिक जागा किंवा मैदानांवर घाण, कचरा व अस्वच्छता दिसल्यास त्याची तक्रार मनपाच्या आरोग्य यंत्रणेकडे करण्याची गरज नाही. त्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने  ‘स्वच्छता अँप’ विकसित केले आहे. यामध्ये शहरात आढळणारे मृत  प्राणी, कचर्‍याचे ढीग तसेच कचरा गाडी आली नसेल, तर त्यासंदर्भातील तक्रार स्मार्ट फोनच्या माध्यमातून नागरिकांना नोंदवता येणार आहे. तक्रार प्राप्त होताच संबंधित प्रभागाच्या आरोग्य निरीक्षकांकडून तक्रारीचे निराकरण केले जाणार आहे. अकोलेकरांनी ३१ डिसेंबरपर्यंत ‘स्वच्छता अँप’ डाउनलोड करण्याचे आवाहन मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले आहे.

आधी २९६ क्रमांक आता ५३!एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणार्‍या शहरांमध्ये राबवल्या जाणार्‍या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेत गतवर्षी अकोला शहर २९६ क्रमांकावर होते. आजरोजी शहर ५३ व्या क्रमांकावर आहे. शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घेतल्यास त्यामध्ये आणखी सुधारणा होईल, अशी अपेक्षा आयुक्त वाघ यांनी व्यक्त केली. 

नागरिकांचा सहभाग महत्त्वाचाशहरात स्वच्छता राखण्यासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे, आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रशासनाकडून मनपा आवार तसेच शहरात विविध भागात ‘स्वच्छता अँप’च्या माहितीसाठी स्टॉल लावल्या जात आहेत. गुरुवारी उपमहापौर वैशाली शेळके यांनी ‘स्वच्छता अँप’च्या स्टॉलला भेट देऊन नागरिकांना आवाहन केले आहे. - 

टॅग्स :Akola cityअकोला शहरcommissionerआयुक्तMuncipal Corporationनगर पालिका