शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांनो! नियम पाळा; अन्यथा निर्बंध वाढतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:18 IST

अकोला : संचारबंदी लागू असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी हाेती. परिणामी, जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्णांची ...

अकोला : संचारबंदी लागू असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी हाेती. परिणामी, जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यावर होत आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात रविवार रात्री १२ वाजेपासून ते शनिवार १५ मेच्या रात्री १२ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेचीच परवानगी असणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीस वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नसल्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे आतातरी अकाेलेकरांनी नियम पाळण्याची गरज आहे अन्यथा निर्बंध वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लाॅकडाऊन हे कुणालाच परवडणारे नाही. आपल्या शहराचे सारे अर्थकारणच ठप्प हाेते, हातावर पाेट असलेल्यांचा राेजगार जाताे. अनेकांना उदरनिर्वाहाची चिंता सतावते. त्यामुळे लाॅकडाऊन हा पर्याय टाळायचा असेल तर नियम पाळणे आवश्यक ठरते. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांची भयावह संख्या समोर येत आहे. त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली मात्र यादरम्यान सकाळी ७ ते ११ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेच्या खरेदीची सूट दिली आहे. या नियमांची सक्त अंमलबजावणी केल्यास रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, जिल्ह्याची परिस्थिती पूर्वीप्रमाणेच दिसून येत आहे. शहराच्या मुख्य बाजारासह रस्त्यांवर गर्दी कायम आहे. नागरिकांचा मुक्त संचार सुरूच असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्बंधांचे संकेत दिले हाेते; मात्र नागरिकांवर याचा काही फरक पडला असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे आता भाजीबाजारासह सर्वच सेवा १५ मे पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. आता अकाेलेकरांनी किमान पुढील पाच दिवस संयम ठेवत या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा शहराच्या अर्थकारणालाच ब्रेक लागेल अन् ते काेणालाही परवडणारे नाही.

--बॉक्स--

भाजी खरेदीसाठी उसळली गर्दी

साेमवारपासून भाजीबाजारही बंद केल्यामुळे रविवारी सकाळी भाजी खरेदीसाठी माेठी गर्दी उसळली हाेती. सकाळी भाज्यांचे भाव तेजीत हाेते. नागरिकांनी पाच दिवसांची नव्हे तर १५ दिवसांची भाजी खरेदी केल्याचे चित्र हाेते.

--बॉक्स--

कठोर निर्बंधांचे हेही एक कारण!

शहरातील डाबकी रोड, कौलखेड रोड, पीकेव्ही तसेच विविध परिसरातील नगरांमध्ये माॅर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉकच्या नावाखाली मुक्त संचार सुरू असताे.

-

--बॉक्स--

पाेलिसांच्या दंडुक्यांशिवाय सुधारणार नाही का?

पहिल्या लाॅकडाऊनमध्ये पाेलिसांनी दंडुक्यांचा वापर केल्यामुळे रस्त्यावरची गर्दी ओसरली हाेती. गेल्या पंधरा दिवसात संचारबंदी असली तरी पाेलिसांनी दंडुक्यांऐवजी दंड हा पर्याय निवडला आहे. पाेलिसांनी केलेल्या दंडालाही नागरिक भीक घालत नव्हते. त्यामुळे रस्त्यावर गर्दी कायमच हाेती. त्यामुळे आता कठाेर निर्बंध आहेत, त्यामुळे बाहेर पडून नका, पुन्हा दंडुकेच हवे आहेत का? असाही प्रश्न निर्माण हाेत आहे.