शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

रेखाकला परीक्षेमध्ये अकोल्याची बाजी

By admin | Updated: February 14, 2015 01:36 IST

बारापैकी ५ मेरिट अकोल्याचे.

अकोला: महाराष्ट्र राज्य शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल १२ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला असून, यामध्ये अमरावती विभागात अकोल्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. गुणवत्ता यादीतील बारापैकी ५ विद्यार्थी अकोल्याचे असून, या जिल्ह्याचा ९६.0४ टक्के निकाल लागला आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएटचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३,९७,0६३ विद्यार्थ्यांनी नावे दाखल केली होती. त्यापैकी ३,६७,९५४ विद्यार्थी परीक्षेला बसले. या परीक्षेचे एकूण १२ विभागातून मूल्यांकन करण्यात आले. अमरावती विभागातून या परीक्षेत १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यामध्ये एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत अकोल्याची मोनिका पानझाडे, प्रतीक्षा डोंगरदिवे या, तर यवतमाळ जिल्ह्यातील इंद्रजित पटीया, साक्षी गोडेकर, प्रज्वल गोट यांचा समावेश आहे. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत अकोल्याची प्राची अहीर, साक्षी दळवी, पूजा डेहानकर, शुभांगी गोरे यांचा समोवश असून, बुलडाण्याचा काजी आयण, यशश्री देशमुख या गुणवत्ता यादीत झळकल्या आहेत. अमरावती विभागात एलिमेंटरी परीक्षेच्या निकालात अकोला जिल्हा प्रथम असून, अमरावती जिल्हा सर्वात मागे आहे. अकोला जिल्ह्याचा निकाल ९६.0४ टक्के, यवतमाळ ९५.१२ टक्के, बुलडाणा ९३.५७ टक्के, वाशिम ९२.३१ टक्के तर अमरावती जिल्ह्याचा निकाल ९0.७९ टक्के लागला आहे. अमरावती जिल्ह्यातून ४८१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४३६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यवतमाळ जिल्ह्यातून १४३५ विद्यार्थ्यांपैकी १३६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अकोला जिल्ह्यातून परीक्षेला बसलेल्या ३४१५ विद्यार्थ्यांपैकी ३२८0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाशिममधून ९६३ विद्यार्थ्यांपैकी ८८९, बुलडाणा जिल्ह्यातून ३७६८ विद्यार्थ्यांपैकी ३३३0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अमरावती विभागातून १४१४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १३२३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.