शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात लवकरच अत्याधुनिक ‘सायबर लॅब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 01:21 IST

सोशल मीडियावर राहणार वॉच; सायबर तज्ज्ञांकडून होणार तपासणी.

सचिन राऊत / अकोलागुन्हेगारीचे स्वरूपही बदलले असून खून, दरोडे, हाणामार्‍या या गुन्हय़ांसोबतच आता सायबर गुन्हय़ांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सायबर गुन्हय़ांचा शोध लावण्यासाठी आणि त्यावर अंकुश मिळविण्यासाठी अकोल्यात लवकरच अत्याधुनिक सायबर लॅब कार्यान्वित होणार आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पाठपुराव्यानंतर या लॅबचा लवकरच शुभारंभ होणार असून सायबर तज्ज्ञांकडून विविध विघातक घडामोडींवर या माध्यमातून वॉच ठेवण्यात येणार आहे.पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यान्वित होणार असलेल्या या अत्याधुनिक सायबर लॅबचे कामकाज सध्याचे सायबर सेलचे कर्मचारी सांभाळणार आहेत. सायबर तज्ज्ञांचीही या लॅबमध्ये उपस्थिती राहणार असून या सायबर लॅबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकण्यात येत असलेले आक्षेपार्ह चित्र, व्हिडिओ यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासोबतच सोशल मॉनिटरिंग सेंटरही या लॅबमध्ये राहणार असून त्यामुळे विविध प्रकारच्या विघातक घडामोडींच्या हालचाली टिपण्यात येणार आहेत. सायबर लॅबमध्ये कॉल डाटा रेकॉर्ड अँनालिसिस करण्यात येणार आहे, तर मोबाइल फॉरेन्सिक अँनालिसिसही याच ठिकाणी होणार आहे.सायबर लॅबमुळे सायबर गुन्हय़ांच्या तपासाला चांगलीच गती येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अकोला जिल्हा पोलीस दलाच्या वैभवात सर्वात मोठी भर टाकणारी ही सायबर लॅब १५ ऑगस्टलाच कार्यान्वित करण्यात येणार असून त्यासाठी संपूर्ण तयारी सायबर सेलकडून करण्यात येणार आहे. दोन संगणकावर चालविण्यात येत असलेले सायबर सेलचे कामकाज सायबर लॅबमध्ये मोठय़ा प्रमाणात सुरू होणार आहे. ही लॅब अत्याधुनिक राहणार असून राज्यातील काही मोजक्याच जिल्हय़ात सदरची लॅब कार्यान्वित असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता अकोल्यात ही लॅब होणार असून अकोला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सायबर गुन्हय़ांवर अंकुश लावण्यास ही लॅब महत्त्वाची राहणार आहे.