अकोला : आॅल इंडिया इंस्टीट्युट आॅफ मेडिकल सायन्स दिल्ली या नामांकित संस्थेमध्ये अकोल्याच्या यशपाल मंगलसिंग पाकळ याची एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी निवड झाली आहे. राज्यातील केवळ तिन विद्यार्थ्यांची एम्ससाठी वर्णी लागली असून त्यामध्ये यशपालचा समावेश आहे. वैद्यकीय प्रवेशसाठी एम्सची स्वतंत्र परीक्षा घेण्यात आली होती. संपूर्ण देशपातळीवर झालेल्या या परीक्षेत यशपालने २८ वा क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेच्या माध्यमातून एम्ससाठी देशभरातून १०० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यशपालने अकोल्यात राहून या परीक्षेचा अभ्यास केला, हे विशेष.वैद्यकीय प्रवेशासाठी झालेल्या अन्य दोन परीक्षांमध्येही त्याने यश मिळवले असून त्यासाठीही तो पात्र ठरला आहे. त्याने दिल्लीतील एम्समध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे. इयत्ता दहावीत तो राज्यातून प्रथम आला होता. (प्रतिनिधी)
अकोल्याच्या यशपालची ‘एम्स’साठी निवड
By admin | Updated: July 6, 2017 14:52 IST