शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या भाजी बाजारात दररोज 50 लाखांची होते उलाढाल

By admin | Updated: May 16, 2017 15:44 IST

 ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 16 - अकोला शहरात दररोज तब्बल ५० लाख रुपयांची भाजी विक्री होत असल्याची आकडेवारी समोर ...

 ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 16 - अकोला शहरात दररोज तब्बल ५० लाख रुपयांची भाजी विक्री होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. शहरातील भाजीबाजारातील दैनंदिन विक्रीतून ही आकडेवारी काढली गेली आहे. अकोल्यात सर्वात मोठा भाजीबाजार जनता बाजारात भरतो. 
 
लहान-मोठे पकडून येथे जवळपास ७०० भाजीविक्रेते आहेत. त्यानंतर जैन भाजीबाजार असून, येथे जवळपास ४०० भाजीविक्रेते आहेत. त्या पाठोपाठ जुने शहरातील किल्ल्याजवळचा बाजारात ५०० भाजीविक्रेते आहेत. सिंधी कॅम्पच्या बाजारात ३०० आणि लहान उमरीच्या शाळेच्या परिसरात ३०० भाजी विक्रेते आहेत. जठारपेठ, कौलखेड, मलकापूर आणि गाडीवरून किरकोळ भाजी विक्री करणा-यांची संख्या किमान ३०० च्या घरात आहे. मोठ्या दुकानदारांची दररोजची उलाढाल ५ हजार रुपयांपर्यंत आणि लहान दुकानदारांची दररोजची उलाढाल २ हजार रुपयांच्या घरात जाते. 
 
सरासरी पाहता एक भाजी विक्रेता दररोज दोन हजार रुपयांची उलाढाल करतो. त्यानुसार ही आकडेवारी पन्नास लाख रुपयांच्या घरात जाते. नाशिकसह अकोलाच्या विविध तालुक्यातून, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. दहा रुपये गड्डी आणि  २० ते ४० रुपये किलोच्या दराने भाजीपाला विक्रीला आहे.
 
प्रत्येक उन्हाळ्यात भाजीपाला तुलनात्मक महाग होतो; मात्र यंदा भाजीपाला महाग नसून, मोठ्या प्रमाणात बाजारात येतो आहे. नाशिकचे गाजर आणि कांदे येत असले तरी इतर भाजीपाला मात्र यंदा जिल्ह्याच्या आजूबाजूनेच अकोल्यात येत असल्याचे चित्र आहे

https://www.dailymotion.com/video/x84b9ck