अकोला: जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जी. श्रीकांत यांची गुरुवारी शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनामार्फत आयएएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांची बदली करण्यात आली; मात्र त्यांच्या बदलीचे ठिकाण (पोस्टिंग) अद्याप निश्चित करण्यात आले नाही. फेब्रुवारी २0१३ मध्ये शिंदे अकोल्यात जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. सव्वादोन वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
*नवे जिल्हाधिकारी सोमवारी रुजू होणार?
अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांकडून सातारा जिल्हा परिषदेच्या वार्षिक निरीक्षणाचा आढावा शनिवारी घेण्यात येणार आहे. त्यानंतर जी.श्रीकांत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.