शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या नासरी चव्हाणने स्वित्झर्लंडमधील परिषदेत केले भारताचे प्रतिनिधित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 14:03 IST

६ फेब्रुवारीला या परिषदेत नासरीने आंतरराष्ट्रीय मंचावर अकोल्याचे नावलौकिक केले.

- नीलिमा शिंगणे-जगड   लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील बराचसा भाग सातपुड्याच्या पर्वतरांगांनी व्यापलेला. येथील आदिवासींचे जीवन, शेती पद्धतीही त्यांच्या संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या; मात्र अलीकडेया भागातील शेती आणि शेती पद्धती आधुनिकतेकडे वळली. हे सकारात्मक बदल एका युवतीने घडवून आणले. नासरी शेकड्या चव्हाण, असे या आदिवासी तरुणीचे नाव. नासरीने स्वित्झर्लंडमधील डोनार्च येथे जागतिक बायोडायनामिक शेती आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. ५ ते ७ फेब्रुवारी रोजी परिषद पार पडली. ६ फेब्रुवारीला या परिषदेत नासरीने आंतरराष्ट्रीय मंचावर अकोल्याचे नावलौकिक केले.तेल्हारा तालुक्यातील बोरव्हा शंभर टक्के आदिवासी असलेले गाव. आधुनिक शेती पद्धतीचा मागमूसही गावात नव्हता; मात्र अलीकडे कृषी समृद्धी प्रकल्पांतर्गत सर्ग विकास समितीच्या एका शेतीशाळेने गावात परिवर्तनाचे बीज रोवले. गावात कंपोस्ट खत, एस. ९ कल्चर आणि सेंद्रिय कीटकनाशक असणाºया तरल खादची निर्मिती सुरू झाली. गावाला या नव्या बदलाला सामोरे जाण्याची प्रेरणा त्यांच्यातीलच एक युवती नासरी चव्हाण.. सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणाºया गोष्टी बारकाईने समजून घेतल्या. त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही तिने घेतले. आदिवासींसाठी नव्या बदलांसाठी मोठा अडसर म्हणजे भाषा. येथील आदिवासींची मातृभाषा ही कोरकू. हिंदीचेही ज्ञान नसल्यासारखेच. त्यामुळे शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकºयांना नवीन तंत्रज्ञान आणि प्रयोगाचे धडे कसे द्यावे, हा प्रश्न होता; मात्र नासरी या प्रश्नाचे उत्तर होती. तिने गावाला कमी खर्चाच्या शेतीचे महत्त्व सांगायला सुरुवात केली.आज या गावात प्रत्येक घरासमोर कंपोस्ट खत निर्मितीचे ढीग शेणामातीने व्यवस्थित लिपलेले दिसतात.सध्या गावातील शेतकºयांच्या रासायनिक खते आणि कीटकनाशकावर होणारा खर्च ९० टक्क्याने कमी झाल्याने शेतकºयांचे जीवनमान उंचावले. अनेक पुरस्कारांची मानकरीनासरीने स्वत:च शिकवायला प्रारंभ केला. स्वत:देखील इंग्रजी बोलणे आणि लिहायला शिकली. तिचा हा संपूर्ण प्रवास सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणला होता. यानंतर अनेक पुरस्कारांची मानकरी नासरी ठरली. केनियातील शेतकरी आणि तज्ज्ञांनीदेखील तिला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या देशात आमंत्रित केले होते. नासरीने दोन दिवसांपूर्वी स्वित्झर्लंडमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाSwitzerlandस्वित्झर्लंडAgriculture Sectorशेती क्षेत्र