शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेचे कामकाज ‘एसओपी’ने चालणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:44 IST

‘३ डी गव्हर्नन्स’ प्रकल्पाबाबत चर्चा झाली. प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता देऊन तातडीने अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले.

अकोला : जिल्हा परिषदेत ३ डी गव्हर्नन्स प्रकल्पानुसार कार्यपद्धती विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळासोबत झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पाची लवकरच अंमलबजावणी सुरू होत असून, त्यासाठीची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पात प्रत्येक अधिकारी-कर्मचाºयाच्या कामकाजाची ‘स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग प्रोसेड्युर’(एसओपी) ठरणार आहे.  या प्रकल्पाबाबत झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे तर महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे विवेक सावंत, समीर पांडे, विनायक कदम उपस्थित होते. बैठकीत जिल्हा परिषदेसाठी नियोजित ‘३ डी गव्हर्नन्स’ प्रकल्पाबाबत चर्चा झाली. प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता देऊन तातडीने अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर कराव्या लागणाºया उपाययोजनांसाठी माहिती गोळा करण्याला सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या त्रिस्तरीय यंत्रणेच्या संस्थात्मक रचनेची तपशीलवार माहिती, प्रत्येक अधिकारी-कर्मचारी सेवापुस्तिकेमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे करीत असलेले कामकाज, त्याच्याकडे असलेल्या जबाबदाºया, त्या कशा पार पाडल्या जातात, कामाचे वर्क फ्लो कसा आहे, त्यासाठी ‘स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग प्रोसेड्युर’ वापरली जाते का, कामे पार पाडण्यासाठी कोणते शासकीय निर्णय, परिपत्रकांचा आधार घेतात, याची तपशीलवार माहिती घेतली जात आहे. जिल्हा परिषदेत येणाºया आवकचा ‘स्टडी रिपोर्ट’ घेण्यात येत आहे. त्यामध्ये विशेषत: नागरिक जिल्हा परिषदेकडून कोणती सेवा मागतात, याचेही विश्लेषण केले जाणार आहे. या माहितीचे अवलोकन करण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे पथक लवकरच जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. त्यानंतर प्रकल्प अंमलबजावणीला सुरुवात केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद