शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

Akola ZP : अखेरच्या पाच मिनिटात चवथे सभापतीपदही ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:21 PM

अर्ज दाखल करण्याच्या मुदतीच्या पाच मिनिटांआधी चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचा अर्ज दाखल करत ते सभापतीपदही ताब्यात ठेवण्यात भारिप-बमसंला यश मिळाले.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सभापती पदाच्या निवडीसाठी लागणाऱ्या बहुमताची संख्या टिकवण्यासाठी समविचारी पक्ष सोबत येतील, त्यांना एक सभापतीपद द्यावे लागणार, हे गृहीत धरून भारिप-बमसंने चारपैकी तीन सभापती पदांसाठी अर्ज दाखल केले. अखेरपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसोबत महाविकास आघाडीमध्ये कायम राहिले. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या मुदतीच्या पाच मिनिटांआधी चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचा अर्ज दाखल करत ते सभापतीपदही ताब्यात ठेवण्यात भारिप-बमसंला यश मिळाले.अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत भाजपचे सदस्य तटस्थ राहिले. सभापती पदाच्या निवडीच्या वेळी हीच परिस्थिती असेल की नाही, याबाबत साशंकता होती. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या समविचारी पक्षाचे पाठबळ मिळेल, ही अपेक्षा भारिप-बमसंच्या नेत्यांना होती. तसे प्रयत्नही करण्यात आले; मात्र या तीनही पक्षांची महाविकास आघाडी अभेद्य राहिली. तर दुसरीकडेही भाजपही तटस्थ राहिला. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना, काँग्रेससोबत सत्तेत सहभागी व्हायचे नाही किंवा सहकार्य करायचे नाही, तर भारिप-बमसंलाही पाठिंबा द्यायचा नाही, असे स्पष्ट निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिले. बहुमत असलेल्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करू द्यावी, त्यासाठी निवड प्रक्रियेदरम्यान सभागृहात उपस्थित न राहणेच चांगले, त्यामुळेच भाजपचे सदस्य अनुपस्थित राहिले. भाजपचा हा पवित्रा भारिप-बमसंच्या पथ्यावर पडला. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणारा ठरला आहे.भारिप-बमसंने अर्ज दाखल न केलेल्या एका सभापतीसाठी अखेरच्या पाच मिनिटांत चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचे नाव पुढे करण्यात आले. त्यानंतर सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये चारही सभापतीपद भारिप-बमसंच्या ताब्यात आले. यावेळी भारिप-बमसंच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेत एकच जल्लोष केला.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्षा सावित्री राठोड, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेतून अशोक वाटिकेपर्यंत मिरवणूक काढली.पांडे गुरुजींना अखेर सभापतीपदचंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी सलग चौथ्यांदा जिल्हा परिषदेचे सभागृह गाठले आहे. गेल्या तीन कार्यकाळात सत्तापदावर नियुक्तीपासून त्यांना हुलकावणी मिळाली. भारिप-बमसंचे उमेदवार म्हणून निवडणूक लढल्यानंतर त्यांना प्रथमच सभापतीपद देण्यात आले आले.सर्व पदाधिकारी नवखेजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजणे, उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश सिरसाट, महिला व बालकल्याण सभापती मनीषा बोर्डे, सभापती पंजाबराव वडाळ हे सर्वच पदाधिकारी सभागृहात नवखे आहेत. त्यांना जिल्हा परिषद समजून घ्यावी लागणार आहे.भाजपचे सदस्य दिवसभर एकत्रभाजपचे सातही सदस्य पक्ष पदाधिकाऱ्यांसह शहरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ते बाहेर पडले. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर विजय अग्रवाल, तालुकाध्यक्ष अंबादास उमाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ