शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेचा कारभार आता संगणकावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 14:12 IST

अकोला: जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, सार्वजनिक लाभाच्या योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कामांचा आढावा संदर्भातील कामकाज आता संगणक प्रणालीद्वारे करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदमार्फत सुरू करण्यात येणार आहे.

अकोला: जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, सार्वजनिक लाभाच्या योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कामांचा आढावा संदर्भातील कामकाज आता संगणक प्रणालीद्वारे करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदमार्फत सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘एमकेसीएल’ कंपनीसोबत लवकरच करार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिली.जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा परिषदमार्फत सद्यस्थितीत ३५ प्रकारच्या विविध योजना राबविण्यात येतात. योजनांची गुणवत्ता जपण्यासाठी आणि योजनांचा लाभ देण्याच्या प्रक्रियेत पुनरावृत्ती (रिपीटेशन) होऊ नये तसेच योजनांचा लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या योजना संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. विकासकामे आणि प्रशासकीयदृष्ट्या कामांचा आढावादेखील या प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे. त्यामुळे कामासाठी लागणारा वेळ, अर्जांसाठी लाभार्थींचा होणारा खर्च वाचणार असून, कामानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा परिषदेत येण्याची गरज भासणार नाही आणि जिल्हा परिषदेचे कामकाज कागदविरहित (पेपरलेस) होणार असल्याचेही सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले. यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे,जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे उपस्थित होते.पाणीटंचाईच्या तक्रार निवारणासाठी यंत्रणा सज्ज!जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई संदर्भात तक्रार निवारणासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज असून, पाणीटंचाई निवारणासाठी गावनिहाय उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा तयार असल्याची माहिती सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली. भूजल पातळी खोल गेल्याने जिल्ह्यात १०५ हातपंप बंद पडले असून, १४ व्या वित्त आयोगांतर्गत निधीतून हातपंप दुरुस्तीची कामे करण्यत येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता किशोर ढवळे यांनी सांगितले.प्रत्येक ग्रा.पं. अंतर्गत ‘रोहयो’चे एक काम!महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत किमान एक काम सुरू करण्यात येणार आहे, त्यासंबंधीचे नियोजन करण्यात आले आहे, असे सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले.६४ गावांना सुकळी तलावातून पाणीपुरवठा!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी उचल करण्याकरिता दोन पंप नादुरुस्त झाल्याच्या स्थितीत सुकळी येथील तलावातून तात्पुरत्या स्वरूपात ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद