शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेत आता प्रत्येक मंगळवार ‘स्वच्छतावार’!

By admin | Updated: November 6, 2014 23:25 IST

राज्यातील पहिला उपक्रम: अधिकारी-कर्मचारी करणार साफसफाई.

संतोष येलकर/अकोलास्वच्छ भारत मिशन अंतर्गत अकोला जिल्हा परिषदेत यापुढे आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेत अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सक्रिय सहभागातून साफसफाईचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रत्येक मंगळवार ह्यस्वच्छतावारह्ण ठरणार आहे. आठवड्यातून एक दिवस स्वच्छतेचा उपक्रम सुरु करणारी, अकोला जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या २ ऑक्टोबरपासून देशभरात ह्यस्वच्छ भारत मिशनह्ण राबविले जात आहे. या स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून, जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या कार्यालयांसह, कार्यालय परिसर, तसेच आवार परिसरात आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व वेगवेगळ्या संवर्गातील कर्मचारी स्वच्छतेचे काम करणार आहेत. या स्वच्छता मोहिमेतच जिल्हा परिषद आवारातील विविध कार्यालयांच्या इमारतींची रंगरंगोटीही करण्यात येणार असून, कचरा साठविण्यासाठी ठिकठिकाणी कचरापेट्या ठेवण्यात येणार आहेत. आठवड्यातून प्रत्येक मंगळवारी स्वच्छता मोहिम राबविण्यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले असून, यासंदर्भात लवकरच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून परिपत्रक काढण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे अकोला जिल्हा परिषदेत आठवड्यातील प्रत्येक मंगळवार ह्यस्वच्छतावारह्ण ठरणार आहे. स्वच्छतेबाबत कर्मचार्‍यांमध्ये जागृता असावी, स्वच्छतेची भावना वाढीस लागावी, कामाचे ठिकाण स्वच्छ असावे, यासाठी एक प्रयोग म्हणून येत्या मंगळवारपासून अकोला जिल्हा परिषदेच्या अधिनस्त सर्व कार्यालय आणि परिसरात स्वच्छता अभियान राबविले जाईल. दर मंगळवारी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण उन्हाळे यांनी सांगीतले.