शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अकोला जिल्हा परिषदेकडील ३.७५ कोटींचा निधी शासनजमा

By admin | Updated: May 25, 2015 02:23 IST

२७ ग्रामपंचायतींच्या इमारतींची बांधकामे, ३५ स्मशानभूमींची विकासकामे बारगळली.

संतोष येलकर / अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामांसह स्मशानभूमी विकास कामांसाठी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला ३ कोटी ७५ लाखांचा निधी गेल्या दोन वर्षांंच्या कालावधीत खर्च होऊ शकला नाही. अखर्चित निधी खर्च करण्यास शासनाकडून मुदतवाढ मिळाली नसल्याने, अखेर हा निधी शुक्रवारी जिल्हा परिषदेला शासनाकडे सर्मपित करावा लागला. निधी शासनजमा करण्यात आल्याने, जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतींच्या इमारतींची बांधकामे आणि ३५ स्मशानभूमींच्या विकास कामांचे नियोजन बारगळले आहे.जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजना २0१२-१३ अंतर्गत जनसुविधा योजनेच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला ३ कोटी ७५ लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) जिल्हा परिषदेला मंजूर करण्यात आला. उपलब्ध एकूण निधीपैकी जिल्ह्यातील सातही तालुक्यात २७ ग्रामपंचायतींच्या नवीन इमारती बांधकामांसाठी २ कोटी ७0 लाख आणि ३५ ग्रामपंचायतींमार्फत स्मशानभूमी विकास, स्मशानभूमी शेड व स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सिमेंट काँक्रीट रस्ते कामांसाठी १ कोटी ५ लाख असे एकूण ३ कोटी ७५ लाखांच्या विकासकामांचे नियोजन जिल्हा परिषदमार्फत करण्यात आले होते. परंतु या विकासकामांसाठी गावांची निवड आणि कामांच्या याद्यांना मंजुरीची प्रक्रिया रखडल्याने, ३१ मार्च २0१५ पर्यंंत जनसुविधांच्या कामांसाठी उपलब्ध असलेला ३ कोटी ७५ लाखांचा निधी खर्च होऊ शकला नाही. गेल्या दोन वर्षांंच्या कालावधीत अखर्चित राहिलेला निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळावी, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत २ जानेवारी २0१५ रोजीच्या प्रस्तावानुसार राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडे मागणी करण्यात आली; मात्र शासनाकडून मुदतवाढ मिळाली नसल्याने, अखर्चित असलेला ३ कोटी ७५ लाखांचा निधी जिल्हा परिषदमार्फत २२ मे रोजी शासनाकडे सर्मपित करण्यात आला. उपलब्ध निधी शासनाकडे जमा करण्यात आल्याने, जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींची बांधकामे आणि ३५ ग्रामपंचायतींमार्फत करावयाच्या स्मशानभूमी विकास, शेड आणि सिमेंट काँक्रीट रस्ते कामांसाठी जिल्हा परिषदेने केलेले नियोजन बारगळले आहे. निधी शासनाकडे परत पाठविण्यात आला असल्याने, या कामांचा मार्ग आता बंद झाला आहे.