शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषद सभापती निवड दोन दिवसांवर; पक्षांमध्ये सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 15:40 IST

सत्तेतील ही पदे काबीज करण्यासाठी राजकीय पक्षस्तरावर सामसूम असल्याचे चित्र आहे.

अकोला : जिल्हा परिषदेच्या चार सभापतींची निवड प्रक्रिया दोन दिवसांवर आली आहे. त्याच वेळी सत्तेतील ही पदे काबीज करण्यासाठी राजकीय पक्षस्तरावर सामसूम असल्याचे चित्र आहे.भारिप-बमसंकडेला पदाधिकारी निवडीसाठी आणखी दोन सदस्यांची गरज आहे. त्याचवेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व एक अपक्ष मिळून सदस्य संख्या २१ एवढी आहे. भाजपकडे ७ सदस्य आहेत. अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत या संख्याबळाच्या समीकरणात भाजपच्या सदस्यांनी बहिर्गमन केल्याने भारिप-बमसंला संधी मिळाली. त्याच वेळी भाजपचे सदस्य सभागृहात उपस्थित असते तर ५३ पैकी सदस्य संख्येतून बहुमत म्हणजे, २७ चा आकडा गाठावा लागला असता. ती संधी आता चार सभापतींच्या निवड प्रक्रियेतही मिळेलच, याची कोणतीही शाश्वती सध्या तरी नाही. सभापती निवडीच्या सभेत संख्याबळाचे कोणतेही समीकरण अस्तित्वात येऊ शकते. महाविकास आघाडीतील कोणता पक्ष भारिप-बमसंसोबत येणार की भाजप महाविकास आघाडीत सहभागी होणार, हे निवड प्रक्रियेतील मतदानाच्या वेळी स्पष्ट होणार आहे. याबाबत भाजपची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्याचवेळी भारिप-बमसंकडूनही चाचपणी सुरू झाली आहे.

काँग्रेसची भूमिका आज ठरणारकाँग्रेसची भूमिका ठरवण्यासाठी उद्या मूर्तिजापूर पंचायत समितीच्या सभेनंतर नेत्यांची चर्चा होणार आहे. पक्षाचा निर्णय झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची भूमिका समजून घेतली जाईल. त्यानंतर महाविकास आघाडीचा घटक म्हणून शिवसेनेसोबत चर्चेअंती निर्णय बुधवारी होऊ शकतो. निवड प्रक्रियेत राजकीय पक्षांची भूमिका म्हणून सहभाग घ्यावा लागतो. त्यानुसार तो घेतला जाईल. कोण सोबत येईल, हा मुद्दा नंतरचा आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद