शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Akola: जिल्हा परिषद ‘सीइओं’नी बसमध्ये केली मतदार जागृती! प्रवाशांसोबत साधला संवाद

By संतोष येलकर | Updated: March 23, 2024 20:42 IST

Akola News: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी अकोला शहरातील जुने बसस्थानक परिसरात एसटी बसमध्ये चढून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ बी. वैष्णवी यांनी मतदार जागृती केली.

- संतोष येलकरअकोला - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी अकोला शहरातील जुने बसस्थानक परिसरात एसटी बसमध्ये चढून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ बी. वैष्णवी यांनी मतदार जागृती केली. बसमधील प्रवाशांसोबत संवाद साधत त्यांनी मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात येत असून, ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

त्यामध्ये शुक्रवार, २२ मार्च रोजी सायंकाळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ उपक्रमाच्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी यांनी शहरातील टाॅवर चौकस्थित जुने बसस्थानक येथे भेट दिली. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसमध्ये जाऊन त्यांनी प्रवाशांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करीत त्यांनी मतदार जागृती केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी विनय ठमके, माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. सुचिता पाटेकर, स्वीप समिती सदस्य गजानन महल्ले, विशाल उपाध्याय आदी उपस्थित होते. खेळाडूंमध्येही केली मतदार जनजागृती !जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप ’ उपक्रमाच्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी यांच्या नेतृत्वातील पथकाने शुक्रवारी शहरातील वसंत देसाई क्रीडांगण येथे उपस्थित राहून खेळाडू व उपस्थित नागरिकांमध्येही मतदार जनजागृती करण्यात आली.

टॅग्स :Votingमतदानmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४