शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेत सीसी कॅमेरा खरेदीत गैरव्यवहार!

By admin | Updated: October 2, 2016 02:49 IST

मर्जीतील पुरवठादारांनाच कंत्राट देण्याचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले चौकशी करण्याचा आदेश.

अकोला, दि. 0१ - जिल्हा परिषद सर्व पंचायत समित्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा खरेदीत वरिष्ठ शासकीय यंत्रणेकडून पंचायत समिती स्तरावर प्रचंड दडपण आणून, मर्जीतील पुरवठादारांनाच कंत्राट देण्याचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आमदार सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी मुख्य सचिवांना चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.आमदार सावरकर यांच्या तक्रारीनुसार, जिल्हा परिषद/पंचायत समिती अंतर्गत कर्मचार्‍यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने सुमारे ३0 लाख रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक गैरमार्गाने खरेदी करण्यात आले. नियोजन समितीला अंधारात ठेवत जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ६ फेब्रुवारी २0१६ रोजी सर्व प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली. विशेष म्हणजे, जिल्हय़ातील सर्व पंचायत समित्यांनी ६ फेब्रुवारी रोजीच जिल्हय़ात सर्वत्र साहित्य खरेदीचे सर्व सोपस्कार पार पाडून निविदा बोलाविल्या. ठरावीक तीन कंत्राटदारांनीच सर्व ठिकाणी दरपत्रक निविदा सादर केल्या. त्यामध्ये अकोला येथील एक, जालना व औरंगाबाद येथील दोन पुरवठादारांचा समावेश आहे. निविदा सुचनांना नियमानुसार पुरेशी प्रसिद्धी देण्यात आली नाही. तसेच सूचना फलकावर नोटीस प्रसिद्ध न केल्यामुळे स्थानिक पुरवठादारांना डावलून मर्जीतील पुरवठादारांना लाभ देण्यासाठीच ही निविदा प्रक्रिया राबविल्याचे दिसून येत असल्याचा आरोप आमदार सावरकर यांनी केला आहे.ज्या बाबींची खरेदी करावयाची होती, तशाच प्रकारच्या बाबींचे दरपत्रक त्याच पुरवठादारांकडून आमदार सावरकर यांनी मागविले असता, त्यांनी निविदेत भरलेले दर व प्रत्यक्ष दरांमध्ये प्रचंड तफावत आढळून आली. साधारणपणे ५५00 रुपये किमतीच्या कॅमेर्‍याची खरेदी २९,२५0 रुपयांत, ९000 रुपयांच्या डीव्हीआर ४९,२५0 रुपयांत, १८ रुपये प्रति मीटरची केबल १८0 रुपयांत, ६00 रुपयांचा पॉवर अँडाप्टर २८00 रुपयांत, तर ११ हजारांची हार्डडिस्क १८ हजार रुपयांत खरेदी करण्यात आली. फिटिंग खर्च साधारणपणे पाच हजार रुपये अपेक्षित असताना, तो २0 हजार रुपये दाखविण्यात आला. शिवाय बाजारपेठेत उपलब्ध नसलेल्या सॉफ्टवेअरची खरेदी ५३ हजार रुपयांना दाखविण्यात आली. दरांमध्ये अशी प्रचंड तफावत सकृद्दर्शनी दिसून आली.