शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत अकोल्याचा करण करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

By रवी दामोदर | Updated: January 2, 2024 15:52 IST

महाराष्ट्रातील ८ विभागातील खेळाडूंच्या सामने व निवड चाचणीमधून करण डिक्करची महारष्ट्र शालेय क्रिकेट संघात निवड झाली आहे.

अकोला : स्थानिक अकोला क्रिकेट क्लबचा खेळाडू करण डिक्कर याने राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले असून, आता पटना येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत तो महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. १७ वर्षाआतील महाराष्ट्र संघात करण डिक्करची निवड झाली आहे. हि बाब जिल्ह्याच्या क्रिडा क्षेत्रासाठी अभिमानाची असून, जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे.

शहरातील माउंट कार्मेल हायस्कूल व अकोला क्रिकेट क्लबचा सलामीला खेळणारा शैलीदार डावखुरा फलंदाज करण डिक्करची १७ वर्षाखालील महारष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महारष्ट्र राज्य, पुणे यांच्या विद्यामाने जिल्हा क्रीडा परिषद, धुळे व धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत राज्यस्तर शालेय क्रिकेट (१७ वर्षाआतील मुले) क्रीडा स्पर्धा शिरपूर येथे संपन्न झाल्या. महाराष्ट्रातील ८ विभागातील खेळाडूंच्या सामने व निवड चाचणीमधून करण डिक्करची महारष्ट्र शालेय क्रिकेट संघात निवड झाली आहे.

पटना येथे होणार राष्ट्रीय स्पर्धाराष्ट्रीय स्तरावरील (आंतरराज्य ) क्रिकेट स्पर्धा जानेवारीच्या उत्तार्धार्त पटना (बिहार) येथे संपन्न होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र संघ सराव शिबिर करून पटनाकरीता रवाना होणार, अशी माहिती अकोला क्रिकेट क्लब जिल्हा हौशी क्रिकेट संघटने मार्फत कळविण्यात आली आहे. करण डिक्करला माउंट कार्मेलचे प्राचार्य फादर जोशलीन तथा अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अशोक तापडिया, उपाध्यक्ष गुरमंदरसिंग छतवाल, सचिव ओम्रकाश बाजोरिया, सहसचिव नरेंद्र पटेल, ऑडीटर मधुकर घोंगे, कर्णधार जावेदअली, सदस्य श्रीराम झुनझुनवाला, शरद अग्रवाल, मनोहर अगडते क्लबचे मार्गदर्शक विजय देशमुख, सुरेश पाटील, विजय तोष्णीवाल माझी कर्णधार भरत डिक्कर आदींनी मार्गदर्शन केले आहे.