अकोला: महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशन अंतर्गत पिंपरी-पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित महापौर चषक राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनी संघाने पाच पदकांसह सांघिक उपविजेतेपद पटकाविले. २७ ते २९ मार्च या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत अकोल्याचा स्टार बॉक्सर दीपक यादव याने सर्वश्रेष्ठ बॉक्सरचा पुरस्कार पटकाविला.५२ किलो वजनगटात सनी पिल्ले रौप्य पदक, ५६ किलो वजनगटात हरिवंश टावरी सुवर्ण पदक, ६0 किलो वजनगटात दीपक यादव, ८१ किलो वजनगटात करण कळमकर यांनी कांस्य पदक, ९१ किलो वजन गटात सुदर्शन येनकर याने रौप्य पदक मिळवित क्रीडा प्रबोधिनी संघाला सांघिक उपविजेतेपद मिळवून दिले. या स्पर्धेत अकोल्याचे अक्षय टेंभुर्णीकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. सर्व बॉक्सर वसंत देसाई क्रीडांगण येथील जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रात राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात सराव करतात. जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले.
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याला उपविजेतेपद
By admin | Updated: April 1, 2016 00:53 IST