शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यासाठी निधी कमी पडू देणार नाही!

By admin | Updated: August 29, 2016 01:29 IST

भाऊसाहेब फुंडकर यांचे प्रतिपादन; भाजप गुजराती मंचाची स्थापना.

अकोला, दि. २८ : जन्मभूमी बुलडाणा जिल्हा असला, तरी कर्मभूमी ही अकोलाच राहिली आहे. अकोला शहराने मला व भाजपला भरभरुन दिले आहे. अकोल्यानेच मला संसदेची वारी घडविली आहे. आता सत्तेत आल्यानंतर परतफेड करण्याची वेळ आली आहे. अकोला शहराच्या विकासासाठी निधीची मुळीच कमी पडू देणार नाही. लोकप्रतिनिधींनी मागावे, आम्ही तत्पर आहोत, असा शब्द रविवारी राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकरांनी गुजराती समाजाच्या साक्षीने दिला.गुजराती समाज हा नेहमीच भारतीय जनता पक्षासोबत राहिलेला आहे. आता अकोला भाजपने गुजराती समाज मंच ही नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. हा गुजरात मंच भाजप व गुजराती समाजाचे नाते अधिक पक्का करणारा नवा पूल ठरेल. स्थानिक संघवीवाडी येथे रविवार, २८ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात भाजप गुजराती मंचाची स्थापना करण्यात आली. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, भाजप महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर उज्ज्वला देशमुख, मनपा सभापती विजय अग्रवाल, गुजराती मंचचे विजय परमार, शीतल रुपारेल, निमेश ठक्कर, दिपेन शहा आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना, भाऊसाहेब फुंडकर यांनी गुजराती समाजाने व्यापारी क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. गुजराती समाज मंचच्या माध्यमातून अकोला भाजपने एक नवी संकल्पना समोर आणल्याचे सांगत, या मंचच्या माध्यमातून गुजराती समाजबांधवांच्या सर्व समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन यावेळी भाऊसाहेब फुंडकर यांनी दिले.तत्पूर्वी, किशोर मांगटे पाटील, आमदार रणधीर सावरकर व आमदार गोवर्धन शर्मा यांनीही आपल्या मनोगतातून गुजराती समाजाने भाजप व शहराच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा ऊहापोह घेतला. प्रास्ताविक, निमेश ठक्कर, संचालन सुनील कोरडिया यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील मान्यवर तसेच गुजराती समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.अशी आहे कार्यकारिणीकार्यकारिणीमध्ये विशेष आमंत्रित म्हणून विजय परमार, शितल रुपारेल, तर सदस्य म्हणून निमेश ठक्कर, डॉ. दीपक वखारिया, अमरिष पारेख, दीपेन शाह, संजय कोरडिया, हरेश शाह, निकुंज गढिया, संदीप दोशी, मयूर गणात्रा, अँड. परेश सोलंकी, किरीट शाह, डॉ. सरजू उनडकाट, प्रकाश लोढिया, डॉ. पराग शाह, तुषार भीमजीयानी, आशिष चंदाराणा, पीयूष कोरडिया, संजय गोडा, मुकेश भाटिया, मित्तल पटेल, हितेश मेहता, विमल सावला, लाला जोगी, समीर शाह यांचा समावेश आहे.