शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोला होलसेल फळ बाजारही जाणार शहराबाहेर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 20:15 IST

अकोला : ट्रान्सपोर्ट, होलसेल किराणा बाजारच्या पाठोपाठ आ ता अकोला होलसेल फळ बाजारही शहराबाहेर जात असल्याचे  संकेत आहेत. तशा हालचाली शहरात सुरू झाल्या असून,  असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी आठ एकर जागा पातूर मार्गावर  घेतली आहे. या जागेवर उभारल्या जाणार्‍या अद्ययावत  मार्केटचा नकाशा महापालिकेकडे मंजुरीसाठी टाकला आहे.  महापालिकेच्या नगर रचना विभागाची मंजुरी मिळताच या  कामाला सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्देपातूर मार्गावर घेतली असोसिएशनने आठ एकर जागाया जागेवर उभारणार अद्ययावत मार्केट नकाशा मार्केट नकाशा  महापालिकेकडे मंजुरीसाठी सादर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ट्रान्सपोर्ट, होलसेल किराणा बाजारच्या पाठोपाठ आ ता अकोला होलसेल फळ बाजारही शहराबाहेर जात असल्याचे  संकेत आहेत. तशा हालचाली शहरात सुरू झाल्या असून,  असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी आठ एकर जागा पातूर मार्गावर  घेतली आहे. या जागेवर उभारल्या जाणार्‍या अद्ययावत  मार्केटचा नकाशा महापालिकेकडे मंजुरीसाठी टाकला आहे.  महापालिकेच्या नगर रचना विभागाची मंजुरी मिळताच या  कामाला सुरुवात होणार आहे.शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी शहरातील ट्रान्स पोर्ट नगर एमआयडीसीत सर्वप्रथम हलविण्यात आले. त्यानंतर  शहरातील होलसेल किराणा बाजार वाशिम बायपास मार्गावर  हलविण्यात आले. दोन मोठय़ा बाजारपेठा यशस्वीपणे  हलविल्या गेल्याने जनता बाजारातील होलसेल भाजी बाजार  हलविण्याचे प्रयोग सुरू झाले. या प्रयोगानंतर आता जनता  बाजारातील अकोला होलसेल फ्रुट्स अँण्ड व्हेजीटेबल मार्केट  हलविले जात आहे.कधीकाळी जैन भाजी बाजारातील मटका बाजाराजवळ  होलसेल भाजी बाजार भरायचा; मात्र तत्कालिन नगरपालिका  प्रशासनाने हा भाजी बाजार १९७४ मध्ये जनता बाजारात  आणला. तेव्हापासून ही ठोक बाजारपेठ येथेच आहे. नो एण्ट्री  आणि वाहतुकीच्या समस्येतून सुटका मिळण्यासाठी महा पालिका आयुक्त अजय लहाने यांनी असोसिएशनकडे  प्रस्ताव  ठेवला. अकोला होलसेल फ्रुट्स अँण्ड व्हेजीटेबल  असोसिएशनचे पदाधिकारी यांनी पातूर मार्गावरील पुलाजवळ  आठ एकर जागा मालकीची घेतली आहे. या ठिकाणी आता  २00 अद्ययावत दुकान उभारले जात असून, प्रस्तावित  आराखड्याचा नकाशा महापालिकेच्या नगर रचना विभागाकडे  २२ सप्टेंबर रोजी मंजुरीसाठी टाकलेला आहे. महापालिकेकडून  मंजुरी मिळताच होलसेल फ्रुट बाजाराच्या बांधकामाला सुरुवात  होणार आहे. एका वर्षाच्या आत ही अद्ययावत बाजारपेठ अस् ितत्वात आणण्याचा प्रयत्न या पदाधिकार्‍यांचा आहे.

कार्यकारिणीचा पुढाकारअध्यक्ष आरिफ खानसह असोसिएशनचे पदाधिकारी  सचिव  मुजाहिल अहेमद खान, मोहमंद युसूफ, शेख फारूख, उपाध्यक्ष  रसूल खा, हयात खा यांच्या पुढाकारात होलसेल फ्रुट बाजारा तील जवळपास ४00 सदस्यांचे विशेष प्रयत्न यासाठी सुरू  आहेत. 

ठोक भाजी बाजारासोबतच आम्हीही बाजारपेठ थाटण्याचा  विचार पदाधिकार्‍यांपुढे ठेवला. त्याला सर्व पदाधिकार्‍यांनी एकमताने मंजुरी देत शेअर दिला. त्यामुळे आमचा प्रयत्न  लवकरच यशस्वी होईल.- आरीफ खान, अध्यक्ष, होलसेल फ्रुट अँण्ड व्हेजीटेबल असोसिएशन,  अकोला.