शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला गारठले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 01:20 IST

कृषी विद्यापीठाने नोंदवले ५.0 अंश तापमान.

अकोला, दि. १३- विदर्भात थंडीची लाट आली असून, येत्या चोवीस तासात ही लाट कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. मागील चोवीस तासात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी विद्यापीठाच्या परिसरात ५.0 अंश तपामानाची नोंद केली आहे. त्यामुळे जिल्हय़ात हुडहुडी भरली असून, ग्रामीण भागात पुन्हा शेकोट्या पेटल्या आहेत. ही थंडी रब्बीतील गहू, हरभरा, मोहरी पिकाला पोषक असली तुरीच्या शेंगा, केळी व इतर फळपिकांना बाधक ठरू शकते. या थंडीमुळे तुरीच्या शेंगा परिपूर्ण कालावधीच्या अगोदर परिपक्व होत आहेत.जानेवारी महिन्यात किमान तापमानात चढ-उतार वाढला असून, ११ जानेवारीपासून किमान तापमानात कमालीची घसरण झाली आहे. ११ जानेवारीला कृषी विद्यापीठाने ६.२ किमान तापमानाची नोंद केली आहे. १२ जानेवारीला ५.४ तर १३ जानेवारीला हे तापमान ५.0 शून्य अंशावर आले आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या १८ तारखेला ९.६, १९ नोव्हेंबरला ९.२, २0 ला ९.0, २१ नोव्हेंबरला ९.६, २२ ला ९.५, २३ तारखेला ९.७ एवढे किमान तापमान होते. तर डिसेंबर महिन्यात १0 तारखेला ७.१, १९ डिसेंबरला ७.२, २0 ला ८.0, २२ रोजी ८.१, तर सर्वाधिक कमी तापामन २७ डिसेंबरला ५.८ अंश होते. मागील तीन वर्षात हे सर्वाधिक कमी तापमान कृषी विद्यापीठाने नोंदवले आहे. या थंडीमुळे तुरीच्या शेंगा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदर परिपक्व होत आहेत. थंडीमुळे अन्नद्रव्याचा पुरवठा तुरीच्या शेंगांना होत नसल्याने फेब्रुवारीत तयार होणारे हे पीक अनेक ठिकाणी आताच काढणीला आले आहे. अंबिया बहार संत्र्याच्या फुलोर्‍यावरही थंडी बाधक तर आहेच केळी पिकांवर जास्त परिणाम करणारी ठरू शकते. थंडीची लाट; काळजी घ्या - जिल्हाधिकारीयेत्या ४८ तासात जिल्हय़ात थंडी वाढणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला असून, जिल्हय़ातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.अतिरिक्त थंडीमुळे केळी लवकर पिवळी पडण्याची शक्यता असल्याने केळी उत्पादक शेतकर्‍यांनी शेताच्या बांधावर काडीकचरा पेटवून धूर करावा त्यामुळे थंडीपासून फळांचा बचाव करता येईल. रब्बीतील हरभरा, गहू पिकांसाठी ही थंडी पोषक आहे. मोहरीदेखील या थंडीने चांगली येईल. शेतकर्‍यांनी फळ पिक ांची काळजी घ्यावी.- डॉ. प्रदीप इंगोले,संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.