शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

सुंदर चित्रांमुळे अकोल्यातील भिंती झाल्या आकर्षक; विद्यार्थ्यांनी  रेखाटली सुंदर चित्रे

By atul.jaiswal | Updated: February 22, 2018 18:37 IST

अकोला:  मनपाने चित्रकलेची आवड असणाऱ्या विदयार्थ्यांच्या मदतीने आज शहराच्या मुख्य रस्त्यांवरील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देणारी सुंदर चित्र रेखाटली आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी  रेखाटली सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देणारी सुंदर  चित्रे. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या चित्रांमुळे शहराच्या सौंदर्यात भर.शहरातील बसस्टँड, रेल्वेस्टेशन यासह मुख्य सार्वजनिक दहा ठिकाणांच्या भिंतींवर चित्र काढली जाणार आहेत.

अकोला: स्वच्छतेच्या बाबतीत अकोला शहर आता कात टाकत आहे. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ मोर्णा मोहिमेच्या प्रचंड यशानंतर नागरिकांनी स्वच्छतेचा ध्यासच घेतला आहे. आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी अकोलेकर सजग झाले आहेत. दरम्यान शहरवासियांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मनपाने चित्रकलेची आवड असणाऱ्या विदयार्थ्यांच्या मदतीने आज शहराच्या मुख्य रस्त्यांवरील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देणारी सुंदर चित्र रेखाटली आहेत. हे चित्र जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. अकोला स्वच्छ सर्वेक्षण-2018 अंतर्गत मनपाने सार्वजनिक भिंतींवर चित्र रेखाटण्याची मोहिम हाती घेतली आहे. शहरातील बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविदयालयाच्या सुमारे 40 विदयार्थ्यांनी आज अशोका वाटीका समोरील वनविभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतींवर स्वच्छतेविषयक संदेश देणारी असंख्य सुंदर चित्रे काढली. या चित्रांमुळे भिंती सजीव झाल्या असून शहराच्या सौंदर्यात वेगळी भर पडली आहे. अतिशय सुंदर अशी ही चित्रे अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. यावेळी महाविदयालयाचे प्राचार्य गजानन बोबडे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. शहरातील बसस्टँड, रेल्वेस्टेशन यासह मुख्य सार्वजनिक दहा ठिकाणांच्या भिंतींवर चित्र काढली जाणार आहेत.

टॅग्स :Akola cityअकोला शहरcollectorतहसीलदार