शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमापासून विद्यार्थी वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 17:05 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना पशुवैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेता यावे, याकरिता तीन वर्षांपूर्वी अकोल्याला शासकीय पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय मिळाले; पण अद्याप जागाच उपलब्ध न झाल्याने महाविद्यालय सुरू झाले नाही आणि त्यामुळे विद्यार्थी पदवी अभ्यासक्र प्रवेशापासून वंचित आहेत.

ठळक मुद्देमागच्या वर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची वाशिम रोडवरील जागा संशोधनासाठी उपयुक्त असून, महाविद्यालय बांधण्यासाठी निश्चित करण्यात आली होती. प्रत्येकी पाच कोटी रुपये निधी मंजूर केला; पण गत तीन वर्षांपासून केवळ जागेअभावी हे महाविद्यालय सुरू होऊ शक ले नाही.

अकोला : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना पशुवैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेता यावे, याकरिता तीन वर्षांपूर्वी अकोल्याला शासकीय पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय मिळाले; पण अद्याप जागाच उपलब्ध न झाल्याने महाविद्यालय सुरू झाले नाही आणि त्यामुळे विद्यार्थी पदवी अभ्यासक्र प्रवेशापासून वंचित आहेत. आता पुन्हा जागा निश्चित करण्यात आल्याचे वृत्त असून, पदव्युत्तर पशू व विज्ञान संस्थेच्या जागेवर हे महाविद्यालय होणार आहे.पश्चिम विदर्भात शासकीय पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयच नसल्याने येथील विद्यार्थ्यांना या शिक्षणासाठी नागपूर, मराठवाडा, पश्चिम मराठवाडा किंवा मुंबईला जावे लागायचे, हे शिक्षण घेण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे अनेकजण इतक्या दूर जात नव्हते. याच अनुषंगाने शासनाने पश्चिम विदर्भात अकोला व खान्देश असे दोन पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात परवानगी देऊन दोन्ही ठिकाणी प्रत्येकी पाच कोटी रुपये निधी मंजूर केला; पण गत तीन वर्षांपासून केवळ जागेअभावी हे महाविद्यालय सुरू होऊ शक ले नाही. मागच्या वर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची वाशिम रोडवरील जागा संशोधनासाठी उपयुक्त असून, महाविद्यालय बांधण्यासाठी निश्चित करण्यात आली होती. आता पुन्हा यात फेरबदल करण्यात आल्याचे वृत्त आहे. जेथे या विषयाशी निगडित पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जातो, तेथे हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. महाविद्यालय मंजूर झाले त्याचवेळी पदव्युत्तर पशुविज्ञान संस्थेच्या जागेवर वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव होता; पण यात सारखे बदल होत गेले. महाराष्टÑ पशुविज्ञान विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरूं चेही याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रयोगशाळा व वर्ग घेण्यास जागा असूनही तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाला प्रवेशापासून ताटकळत ठेवण्यात आले.

स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची जागा उपलब्धपदवी अभ्यासक्रम पाच वर्षांचा असल्याने ३०० विद्यार्थी येथे असतील. उर्वरित स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे १२० विद्यार्थी म्हणजेच जवळपास ५०० विद्यार्थी येथे शिक्षण घेणार आहेत. त्यासाठीची जागा स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेकडे आहे. यामध्ये काही जागा घ्यावी लागेल. त्यासाठीची कृषी विद्यापीठाची जागाही उपलब्ध आहे. असे असताना नवीन इमारतीचा घाट घातला जात होता.

  पदव्युत्तर संस्थेच्या जागेवर एकत्र शैक्षणिक संकुल असावे, यासाठी पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय येथे सुरू करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे; पण हे आपल्या हाती नाही.डॉ. हेमंत बिराडे

टॅग्स :Akolaअकोलाcollegeमहाविद्यालय