शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Akola: सनदी लेखापाल यांचे दोन दिवसीय संमेलन शेगावात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड येणार

By atul.jaiswal | Updated: August 19, 2023 20:27 IST

Akola: शुक्रवार २५ व शनिवार २६ ऑगस्ट रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सनदी लेखापालांचे दोनदिवसीय उपप्रादेशिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

- अतुल जयस्वालअकोला - सनदी लेखापालांना बदलत्या आर्थिक घडामोडींची माहिती व्हावी, त्यांच्या व्यावसायिक व करिअरविषयक ज्ञानात मोलाची भर पडावी या हेतूने वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अकोला व अमरावती शाखेच्या वतीने शुक्रवार २५ व शनिवार २६ ऑगस्ट रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सनदी लेखापालांचे दोनदिवसीय उपप्रादेशिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची उपस्थिती लाभणार असून सनदी लेखापालांच्या असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्षांसोबतच ख्यातनाम वक्ते या संमेलनात उपस्थित राहणार असल्याची माहिती सनदी लेखापाल असोसिएशन अकोला शाखेच्या अध्यक्ष सीए सीमा बाहेती यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

अमरावती विभागातील समस्त सनदी लेखापालांसाठी आयोजित या संमेलनाचा प्रारंभ २५ ऑगस्ट रोजी भागवत कराड यांच्या हस्ते तसेच सनदी लेखापाल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी, राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए रणजित अग्रवाल, आयोजन समितीतील सनदी लेखापालांच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सीए अर्पित काबरा, पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष हितेश कोमल, सचिव सीए सौरभ अजमेरा, कोषाध्यक्ष सीए केतन सैया आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यानंतर तांत्रिक व्याख्यानांचा प्रारंभ करण्यात येऊन या व्याख्यानाचे पहिले पुष्प सीए सुनील गभावाला हे गुंफणार असून जीएसटी संदर्भातील लवाद कसा हाताळावा यावर ते व्याख्यान सादर करणार आहेत.

दुपारी सनदी लेखापाल संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे हे सीए व्यवसायाचे वर्तमान चित्र, जागतिक संधी व नवीन टप्पे यावर व्याख्यान सादर करणार आहेत. तिसरे पुष्प सीए विमल पुनमिया हे गुंफणार आहेत. द्वितीय दिनाचे प्रथम पुष्प डॉ. सीए गिरीश आहुजा हे भांडवली लाभांमधील गंभीर मुद्दे या विषयावर गुंफणार आहेत. यानंतर सनदी लेखापाल संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सीए निहार जम्बुसरिया हे विश्वस्त संस्था यावर व्याख्यान सादर करणार आहेत. दुपारी स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज हे भारतीय संस्कृतीमध्ये व्यवस्थापन शास्त्र या विषयावर आपले व्याख्यान सादर करणार आहेत. पत्रकार परिषदेला सचिव सीए सुमित आलिमचंदानी, सीए प्रमोद भंडारी, व सीए रमेश चौधरी उपस्थित होते.

टॅग्स :chartered accountantसीएBhagwat Karadडॉ. भागवतAkolaअकोला