शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील ट्रान्सपोर्ट संचालकाने थकविले सात कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:14 IST

अकोला : डब्बा ट्रेडिंगच्या सट्टाबाजारातील आर्थिक फटक्यात अकोल्यातील एका नामवंत ट्रान्सपोर्टचे संचालक आणि असोसिएशनचे पदाधिकारी यांनी सात कोटींची रक्कम थकविली आहे. बँकांचे तीन कोटी  आणि  हुंडीचिठ्ठीची  चार कोटी  एवढी रक्कम अचानक थांबविल्याने अकोला बाजारपेठ हादरली आहे. औद्योगिक वसाहतीमधील चार दालमिल संचालकांनी कोट्यवधींची रक्कम थांबविल्यानंतर आता ट्रान्सपोर्ट संचालकही या रांगेत आले आहेत.

ठळक मुद्देतीन कोटी बँकांचे, तर चार कोटी हुंडीचिठ्ठीचे डब्बा ट्रेडिंगच्या सट्टाबाजारातील आर्थिक फटकाअचानक एवढी रक्कम थांबविल्याने अकोला बाजारपेठ हादरली

 

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डब्बा ट्रेडिंगच्या सट्टाबाजारातील आर्थिक फटक्यात अकोल्यातील एका नामवंत ट्रान्सपोर्टचे संचालक आणि असोसिएशनचे पदाधिकारी यांनी सात कोटींची रक्कम थकविली आहे. बँकांचे तीन कोटी  आणि  हुंडीचिठ्ठीची  चार कोटी  एवढी रक्कम अचानक थांबविल्याने अकोला बाजारपेठ हादरली आहे. औद्योगिक वसाहतीमधील चार दालमिल संचालकांनी कोट्यवधींची रक्कम थांबविल्यानंतर आता ट्रान्सपोर्ट संचालकही या रांगेत आले आहेत.   एका ट्रेडिंग कंपनीचे संचालक, अकोल्यातील ट्रान्सपोर्ट विभागातील नामांकित व्यक्ती यांनी अकोल्यातील काही बँकांकडून तीन कोटी रुपयांचे कर्ज घेतले. सोबतच हुंडीचिठ्ठी बाजारातूनही चार कोटी रुपये व्याजाने उचललेत. या रकमेचा विनियोग व्यापारात लावण्याऐवजी या व्यक्तीने ही रक्कम डब्बा ट्रेडिंगमध्ये गमाविली. बाजारपेठेतील मंदीचा जबर फटका या ट्रान्सपोर्ट संचालकास बसला. त्यामुळे त्यांनी अकोला बाजारपेठेतील हुंडीचिठ्ठी दलालांची रक्कम थांबविली आहे. तीन प्रमुख बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्तेही बंद झाल्याने बँकांनीदेखील रक्कम वसुलीसाठी आता मोहीम सुरू केली आहे. अकोलाच्या औद्योगिक वसाहतीमधील चार दालमिल संचालकांनी अकरा कोटींची हुंडीचिठ्ठीची रक्कम थांबविल्या पाठोपाठ ट्रान्सपोर्ट संचालकाने सात कोटी थांबविल्याने अकोल्यातील इतर बाजारपेठेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे.

हुंडीचिठ्ठी दलाल सतर्कमोठमोठय़ा फर्मच्या नावाने कधीकाळी काहीही चौकशी न करता कोट्यवधींची रक्कम दिली जायची. हुंडीचिठ्ठी दलालांजवळ व्यापारी फर्मची प्रतिष्ठा होती; मात्र अलीकडच्या काळात अनेक नामवंत फर्मने दिवाळे काढलेत. त्यामुळे अकोल्यातील हुंडीचिठ्ठी दलाल सतर्क झाले आहेत. रक्कम देताना आता फर्मच्या आर्थिक व्यवहाराची चाचपणी केली जात आहे.