शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अकोला-तिरुपती विशेष एक्स्प्रेस जानेवारी अखेरपर्यंत धावणार

By atul.jaiswal | Updated: December 21, 2023 14:24 IST

या रेल्वेला महिनाभराची मुदतवाढ मिळाल्याने अकोलेकर प्रवाशांना तिरुपती जाणे शक्य होणार आहे.

अकोला : सणासुदीच्या दिवसांत होत असलेली अतिरिक्त गर्दी आणि प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने अकोला-तिरुपती-अकोला एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे आता जानेवारी २०२४ अखेरपर्यंत धावणार आहे.

नांदेड रेल्वे विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ०७६०६ अकोला-तिरुपती ही साप्ताहिक गाडी ७ जानेवारी २०२४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत दर रविवारी ८:१० वाजता अकोला स्थानकावरून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ६:२५ वाजता तिरुपती स्थानकावर पोहोचणार आहे.

०७६०५ तिरुपती-अकोला ही साप्ताहिक गाडी ५ जानेवारी २०२४ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी १२:३० वाजता तिरुपती स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी अकोला स्थानकावर १२:१५ वाजता येणार आहे. या गाडीच्या अप व डाऊन अशा एकूण १० फेऱ्या होणार आहेत. या रेल्वेला महिनाभराची मुदतवाढ मिळाल्याने अकोलेकर प्रवाशांना तिरुपती जाणे शक्य होणार आहे.