शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : शिवणी-शिवर रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रस्ताच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:53 IST

अकोला : विदर्भ-मराठवाड्याला जोडणार्‍या शिवणी-शिवर रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रस्ताच नसून, लहानशी पायी वाट आहे, त्यावरही पथदिवे नाहीत. त्यामुळे मलकापूर, शिवणी-शिवर येथील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असून, रात्रीच्या प्रसंगी भुरट्या चोरांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देरेल रोको करणार माजी सरपंच राजू वगारे यांचा इशारालोकमत न्यूज नेटवर्क

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भ-मराठवाड्याला जोडणार्‍या शिवणी-शिवर रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रस्ताच नसून, लहानशी पायी वाट आहे, त्यावरही पथदिवे नाहीत. त्यामुळे मलकापूर, शिवणी-शिवर येथील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असून, रात्रीच्या प्रसंगी भुरट्या चोरांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता आणि पथदिव्यांचा प्रश्न संबंधित अधिकार्‍याने एक महिन्याच्या आत मार्गी न लावल्यास रेल रोको करण्यात येणार असल्याचा इशारा मलकापूरचे माजी सरपंच राजू वगारे यांनी प्रसिद्धिपत्रकात दिला आहे.दक्षिण मध्य रेल्वेवरील पूर्णा- अकोला हा ब्रॉडगेज करण्यात आला आहे. या मार्गावरून आता अकोला-पूर्णा, अकोला-काचीगुडा, नागपूर-कोल्हापूर अशा रेल्वेगाड्या धावत आहेत. सध्या या मार्गावरून अकोला-महू, अकोला-खंडवा, अकोला-जयपूर अशा रेल्वेगाड्या धावतात. २00९ मध्ये अकोला पूर्णा रेल्वे मार्गावर शिवणी-शिवर येथे नवीन स्थानक झाले आहे. ते मुख्यत: औद्योगिक परिसरातील मालवाहतुकीसाठी बांधण्यात आले आहे. येथे जाण्यासाठी काहीच सुविधा नाही.मराठवाड्यातील परभणी, पूर्णा, परळी नांदेड या भागासह वाशिम जिल्ह्यातील रोजगारासाठी अकोलात आलेल्या बेरोजगारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. अकोल्यावरून वाशिमसाठी  अप-डाउन करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यांना ये-जा करण्यासाठी अकोला-पूर्णा, परळी-अकोला या रेल्वेने प्रवास करणे सोयीचे जाते. शिवणी-शिवर रेल्वेस्थानक एमआयडीसी परिसरात येत असल्यामुळे रेल्वेने प्रवास करण्यामध्ये कामगारांची संख्याही जास्त आहे; मात्र रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रस्ता नाही, पायवाट आहे. त्यावर पथदिवे नाहीत. रात्रीच्या वेळी प्रवाशांना भुरट्या चोरांचा सामना करावा लागतो. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी  रस्ता आणि पथदिव्यांची व्यवस्था करावी, अन्यथा रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू वगारे यांनी प्रसिद्धिपत्रकात केला आहे.

टॅग्स :Shivni-Shivpur railway stationशिवनी-शिवपूर रेल्वे स्थानकAkola cityअकोला शहर