शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अकोला : ‘जीएमसी’मधील दोन प्राध्यापकांचा वाद चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापिकेने सोमवारी त्याच विभागाच्या प्रमुखाविरुद्ध थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर गत अनेक दिवसांपासून अंतर्गत असलेला या दोन प्राध्यापकांमधील वाद चव्हाट्यावर आला. सदर प्राध्यापिकेने याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही तक्रार केल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.जनऔषधवैद्यक ...

ठळक मुद्देप्राध्यापिकेची विभागप्रमुखाविरुद्ध तक्रार प्रकरण गेले वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापिकेने सोमवारी त्याच विभागाच्या प्रमुखाविरुद्ध थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर गत अनेक दिवसांपासून अंतर्गत असलेला या दोन प्राध्यापकांमधील वाद चव्हाट्यावर आला. सदर प्राध्यापिकेने याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही तक्रार केल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.जनऔषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण हुमणे हे आपल्याला व आपल्या पतीला मानसिक त्रास देत असल्याची लेखी तक्रार सहयोगी प्राध्यापिका डॉ. कल्पना काळे (अस्वार) यांनी सोमवार, २२ जुलै रोजी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की डॉ. हुमने हे विनाकारण कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक त्रास देत आहेत. याबाबत आपण अधिष्ठातांकडेही तक्रार केली आहे. तसेच ७ नोव्हेंबर २0१७ रोजी झालेल्या मानसिक छळाबद्दल आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडेही तक्रार केल्याचे डॉ. काळे यांनी या तक्रारीत म्हटले आहे. डॉ. हुमने हे आपल्यावर वैयक्तिक टीका करीत असून, ते कनिष्ठ प्राध्यापकांना आपल्याविरुद्ध भडकावत असल्याचा आरोपही डॉ. काळे यांनी या तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे आपण प्रचंड तणावाखाली असून, आपले दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या संदर्भात डॉ. हुमने यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठितडॉ. हुमने व डॉ. काळे यांच्यात गत अनेक दिवसांपासून वाद सुरू असून, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी या दोघांमधील वाद सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु यामध्ये यश आले नाही. त्यामुळे त्यांनी डॉ. काळे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. सदर समितीचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

वाद सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्नदोन वरिष्ठ प्राध्यापकांमधील हा अंतर्गत वाद असल्याने तो सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दोघांनाही अधिष्ठातांच्या कक्षात समोरा-समोर बसवून चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दोघांचाही वाद सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkola cityअकोला शहर