शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला संघाला बॉक्सिंगमध्ये सर्वसाधारण विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 14:26 IST

अकोला संघाने २६ गुणांसह ४ सुवर्ण व १ कांस्यपदक पटकावत राज्यात प्रथम स्थानासह अजिंक्यपद मिळविले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: १९ व्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप रविवारी झाला. स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद अकोला शहर संघाने पटकावले. अकोला संघाने २६ गुणांसह ४ सुवर्ण व १ कांस्यपदक पटकावत राज्यात प्रथम स्थानासह अजिंक्यपद मिळविले. २१ अंकासह मुंबई उपविजेता आणि ११ अंकासह पुणे संघाने तृतीय स्थान मिळविले.बेस्ट चॅलेंजरचा पुरस्कार पिंपरी चिंचवडची नीतू सुतार हिने पटकावला. बेस्ट प्रमोसिंग बॉक्सरचा खिताब मुंबईच्या सिमरन हिने मिळविला. बेस्ट रेफरी ठाण्याच्या रिना माने ठरल्या. बेस्ट जज विनोद राठोड ठरले. बेस्ट कोच पुरस्कार विकास काटे यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट बॉक्सर अकोल्याची दिया बचे ठरली.स्पर्धेत ४८ किलो वजनगटात दिया बचे, ५१ किलो संगीता रुमाले अकोला शहर, ५४ किलो तेजस्विनी औरंगाबाद, ५७ किलो लक्ष्मी मेहरा पुणे, ६० किलो पूनम कैथवास अकोला शहर, ६४ किलो सिमरन मुंबई जिल्हा, ६९ किलो भाग्यश्री पुरोहित मुंबई जिल्हा, ७५ किलो मनीषा ओझा मुंबई जिल्हा, ८१ किलो ऋतुजा देवकर मुंबई जिल्हा, ८१ किलोच्या वर शायान पठाण अकोला शहर या खेळाडूंनी सुवर्णपदकासह महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्चित केले.बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून निवासी जिल्हा अधिकारी प्रा. संजय खडसे, माजी सहायक जिल्हा अधिकारी ओमप्रकाश अग्रवाल, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, पंकज कोठारी, प्रा. गणेश बोरकर, डॉ. कृष्णमुरारी शर्मा, डॉ. अमोल व राधिका केळकर, गुरुमित गोसल व अधीक्षक अभियंता नरेंद्र चौधरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना चषक आणि पदक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांची निवड केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात झाली असल्याची घोषणा स्पर्धा संयोजक डॉ. सतीशचंद्र भट्ट यांनी यावेळी सांगितले. मान्यवरांनी विजेत्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Akolaअकोलाboxingबॉक्सिंग