शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Akola: भाजपच्या दबावातून दिला टॅक्स वसूलीचा कंत्राट, ठाकरे गटाचा आरोप

By आशीष गावंडे | Updated: August 26, 2023 19:28 IST

Akola: भाजपाच्या दबावतंत्रातून महापालिका प्रशासनाने शहरातील मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन करणे व टॅक्स वसूलीसाठी खासगी एजन्सीला कंत्राट दिल्याचा आराेप शिवसेनेचे (ठाकरे गट) शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी शनिवारी आयाेजित पत्रकार परिषदेत केला.

- आशिष गावंडे अकाेला - भाजपाच्या दबावतंत्रातून महापालिका प्रशासनाने शहरातील मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन करणे व टॅक्स वसूलीसाठी खासगी एजन्सीला कंत्राट दिल्याचा आराेप शिवसेनेचे (ठाकरे गट) शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी शनिवारी आयाेजित पत्रकार परिषदेत केला. प्रशासनाच्या निर्णयामुळे अकाेलेकरांच्या खिशातून एजन्सीच्या घशात सुमारे ४० काेटी रुपये घातल्या जाणार आहेत. याविराेधात येत्या साेमवारपासून प्रभाग निहाय स्वाक्षरी माेहीम राबविणार असल्याची माहिती राजेश मिश्रा यांनी दिली.

महापालिकेने सन २०१६ मध्ये हद्दवाढ क्षेत्रासहित शहरातील मालमत्तांचे ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती केली हाेती. निकषानुसार मनपाने दर पाच वर्षांनंतर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे क्रमप्राप्त आहे. २०२२ राेजी ही मुदत संपुष्टात आल्यामुळे प्रशासनाने पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला. तसेच मालमत्ता कर, पाणीपट्टी, बाजार वसुलीची जबाबदारीही खासगी एजन्सीकडेच साेपविण्याचा निर्णय घेत निविदा प्रक्रिया राबवली. निविदा प्रक्रियेत झारखंडमधील रांची येथील स्वाती इंडस्ट्रीज व स्पॅराे साॅफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत अर्ज प्राप्त झाले हाेते.

यापैकी स्वाती इंडस्ट्रीजने ८.३९ दराने सादर केलेली निविदा प्रशासनाने मंजूर केली. मनपाच्या मालमत्ता कर विभागातील कर वसूली लिपीक टॅक्सची रक्कम वसूल करण्यासाठी सक्षम आहेत. असे असताना खासगी एजन्सीकडे टॅक्स वसूलीची जबाबदारी केवळ भाजपच्या दबावापाेटी देण्यात आल्याचा आराेप शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रम मंगेश काळे, मुकेश मुरुमकार,शहर प्रमुख राहुल कराळे, युवा सेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर, शरद तुरकर, मनीष मोहड, गजानन बोराळे, संजय अग्रवाल आदी उपस्थित हाेते. 

अकाेलेकरांवर पुन्हा टॅक्स वाढीचे संकटमालमत्तांचे पुनर्मुल्यांकन केल्यानंतर टॅक्सच्या रकमेत पुन्हा वाढ हाेणार असल्याची माहिती राजेश मिश्रा यांनी दिली. प्रशासनाच्या मनमानी कारभाराविराेधात टप्प्याटप्प्याने आंदाेलन छेडणार असून पहिल्या टप्प्यात प्रभाग निहाय स्वाक्षरी माेहीम राबवली जाणार असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली.

टॅग्स :Akolaअकोला