शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात अकोला तालुक्याची आघाडी, तेल्हारा तालुका माघारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST

अकोला : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, या मोहिमेत अकोला तालुका आघाडीवर आहे. शुक्रवार, २० ...

अकोला : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, या मोहिमेत अकोला तालुका आघाडीवर आहे. शुक्रवार, २० ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार तेल्हारा तालुका मात्र लसीकरणात माघारल्याचे चित्र आहे. शहरी भागांमध्ये लसीकरणास नागरिकांचा चांगला प्रतिसाद असला, तरी ग्रामीण भागात उदासीनता दिसून येत आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली असून, आतापर्यंत जवळपास ५ लाख ८६ हजार नागरिकांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे. आरोग्य विभागाकडून कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे डोस देण्यात आहेत. कोरोना संसर्गाची लाट उच्च पातळीवर होती, तेव्हा लसीकरणास नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. गत काही दिवसांपासून कोरोनाची लाट ओसरल्यामुळे लसीकरणाची गतीही मंदावल्याचे चित्र आहे.

तालुकानिहाय असे झाले लसीकरण (नागरिक)

तालुका पहिला डोस दुसरा डोस

अकोला ३८,१६८ १३,६८८

अकोट २९,०१५ ९,४२८

बाळापूर २६,३९१ ७,२२३

मूर्तिजापूर २६,३८१ ७,५०८

पातूर २५,९४१ ७,२०२

बार्शीटाकळी २३,३९९ ७,१९१

तेल्हारा २२,४७० ९,०५९

अकोला महापालिका क्षेत्रात सर्वाधिक लसीकरण

लसीकरणास अकोला शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १ लाख ५४ हजार नागरिकांनी लसीचा एक डोस घेतला आहे. ७८,८७५ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत.

तालुक्याच्या शहरांमध्येही समाधानकारक स्थिती

जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या शहरांमध्ये लसीकरणाची स्थिती समाधानकारक आहे. सातही शहरांमध्ये आतापर्यंत ६९,०२७ नागरिकांनी लसीचा एक, तर ३१,४४३ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.