शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Akola: जागा महानगरपालिकेला हस्तांतरीत; सत्ताधारी हायकोर्टात जातील काय? जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत विरोधकांची विचारणा

By संतोष येलकर | Updated: February 22, 2024 15:25 IST

Akola News: अकोला शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेची जागा महानगरपालिका प्रशासकीय इमारतीसाठी हस्तांतरित करण्याचा आदेश राज्य शासनामार्फत काढण्यात आला असून, या आदेशाच्या विरोधात जिल्हा परिषदेतील सत्ताधारी हायकोर्टात जाण्याची हिंमत दाखवतील काय, अशी विचारणा जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत बुधवारी विरोधी गटाच्या सदस्यांनी केली.

- संतोष येलकर- संतोष येलकरअकोला - शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेची जागा महानगरपालिका प्रशासकीय इमारतीसाठी हस्तांतरित करण्याचा आदेश राज्य शासनामार्फत काढण्यात आला असून, या आदेशाच्या विरोधात जिल्हा परिषदेतील सत्ताधारी हायकोर्टात जाण्याची हिंमत दाखवतील काय, अशी विचारणा जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत बुधवारी विरोधी गटाच्या सदस्यांनी केली.अकोला शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या जागेचे प्रकरण २०१८ पासून न्यायप्रविष्ट असताना, संबंधित शाळेची १ लाख ५८ हजार ५१६ चौरस फूट जागा अकोला महानगरपालिका प्रशासकीय इमारत बांधकामासाठी विनामोबदला महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत गेल्या १२ फेब्रुवारी रोजी काढण्यात आला.

जागा हस्तांतरणाच्या या आदेशाविरोधात जिल्हा परिषदेतील सत्ताधारी हायकोर्टात जाण्याची तयारी दाखवतील काय, अशी विचारणा विरोधी गटाचे सदस्य डाॅ.प्रशांत अढाऊ यांनी सभेत केली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जागा हस्तांतरित करता येते काय, यासंदर्भातील माहिती घेऊन, जिल्हा परिषद उर्दू शाळेची संबंधित जागा हस्तांतरित करण्याच्या आदेशाविरोधात हायकोर्टात जाण्याची तयारी सुरू असल्याचे उत्तर जिल्हा परिषद सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभेत दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी, उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण व आरोग्य सभापती माया नाइक, महिला बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, कृषी सभापती योगीता रोकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्यासह समितीचे सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, गोपाल दातकर, डाॅ.प्रशांत अढाऊ, मीना बावणे, चंद्रशेखर चिंचोळकर, रायसिंग राठोड, प्रकाश आतकड व संबंधित अधिकारी उपस्थित होते. अंगणवाडीचे काम अपूर्ण असताना पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले कसे?बाळापूर तालुक्यातील बल्लाडी येथील अंगणवाडी इमारत बांधकामासाठी ८ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ७ लाख ५० हजार रुपयांचे देयक अदा करण्यात आले. या कामात स्वच्छतागृहाचे काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे काम अपूर्ण असताना काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले कसे, अशी विचारणा जिल्हा परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाचे गटनेता गोपाल दातकर यांनी सभेत केली. त्यानुषंगाने संबंधित अंगणवाडी इमारतीचे बांधकाम पूर्ण करून घेण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी सभेत दिले.

टॅग्स :Akolaअकोला