शहरं
Join us  
Trending Stories
1
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
2
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
3
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
4
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
5
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
6
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
7
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
8
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे
9
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान
10
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
11
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
12
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
13
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
14
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
15
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
16
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
17
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
19
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
20
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

अकोला : ‘डीपीसी’ मतदान प्रक्रियेवर शिवसेना-काँग्रेसचा आक्षेप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 1:41 AM

अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी  शुक्रवारी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत मतपत्रिका व ‘काउंटर’वर टाकण्यात आलेल्या एकच अनुक्रमांकामुळे गोपनीयतेचा भंग होत असल्याने, मतदान प्रक्रियेवर शिवसेना व काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप नोंदवित फेरमतदानाची मागणी केली.

ठळक मुद्देफेरमतदान घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी  शुक्रवारी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत मतपत्रिका व ‘काउंटर’वर टाकण्यात आलेल्या एकच अनुक्रमांकामुळे गोपनीयतेचा भंग होत असल्याने, मतदान प्रक्रियेवर शिवसेना व काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप नोंदवित फेरमतदानाची मागणी केली. जिल्हा नियोजन समितीच्या १४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मतदारसंघातून चार, महानगरपालिका मतदारसंघातून सात व नगरपालिका मतदारसंघातून तीन सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत सात उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सात जागांसाठी २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. सात जागांसाठी १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, पसंतीक्रम नोंदवून मतदारांनी मतदान केले. अकोल्यातील तीन केंद्रांवर मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मनपा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मतत्रिकेवरील अनुक्रमांक आणि मतदारांना देण्यात येणार्‍या ‘काउंटर स्लीप’वरील अनुक्रम एकच टाकण्यात आले असून, मतदानासाठी मतदान कक्षात एक-एक मतदारांना न सोडता एकत्रच सोडण्यात येत आहे. त्यामुळे मतदाराने (सदस्याने) कोणाला मतदान केले, हे माहीत होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग होत असल्याने, मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेत, शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी फेरमतदानाची मागणी केली. या प्रकाराची माहिती मिळताच आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार तथा काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मतदान केंद्राला भेट देऊन, यासंदर्भात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी चर्चा केली. मतदान प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग होत असल्याचे त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. मतदान प्रक्रिया नियमानुसारच घेण्यात येत आहे, तथापि गोपनीयतेचा भंग होणार नाही, यासाठी मतपत्रिकेवर अनुक्रमांकाच्या ठिकाणी स्टिकर लावण्यात येणार असून, निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याचे अश्‍वासन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले. यावेळी मनपातील शिवसेना गटनेते राजेश मिश्रा, काँग्रेसचे गटनेते साजीद खान पठाण, भारिप-बमसं गटनेत्या अँड. धनश्री देव, नगरसेवक मंगेश काळे, शाहीन अंजुम महेबुब खान, पराग कांबळे व इतर नगरसेवक उपस्थित होते. उपस्थित नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेवर आक्षेप असल्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केले.

१५ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद ’; आज फैसला !जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात जागांसाठी  १५ उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये ‘सीलबंद’ झाले. शनिवारी रविवार ३0 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मतमोजणी होणार आहे. मतदान प्रक्रियेत जिल्हा परिषद मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातून एका जागेसाठी महादेव गवळे व सरला मेश्राम, मनपा मतदारसंघात सर्वसाधारण प्रवर्गातून दोन जागांसाठी शारदा ढोरे, शीतल गायकवाड, खान शहीन अंजुम महेबूब आणि सर्वसाधारण प्रवर्गातून दोन जागांसाठी महापौर विजय अग्रवाल, राजेंद्र गिरी व मंगेश काळे, तर नगरपालिका मतदारसंघात सर्वसाधारण प्रवर्गातून एका जागेसाठी राजेश खारोडे, मुशीरुल हक अमीरुल हक, नासीर हुसेन सफदर हुसेन, मीतेश मल्ल आणि नामाप्र स्त्री प्रवर्गातून एका जागेसाठी रेशमा अंजुम अफजलखा, गंगा चंदन, सुनीता भुजबले इत्यादी १५ उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले आहे.  

टॅग्स :Akola cityअकोला शहर