शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : स्वाइन फ्लूचे नऊ महिन्यात सात बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:20 IST

अकोला: राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाइन फ्लू या अत्यंत संसर्गजन्य आजाराने अकोल्यातही पाय पसरण्यास सुरुवात केली असून, जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ या नऊ महिन्यांच्या कालावधीत या आजाराने जिल्ह्यातील नऊ जणांचा बळी घेतला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत शहर आणि जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ६७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ असून, आतापर्यंत सात रुग्ण या आजारामुळे दगावल्याची नोंद आहे.पॉझिटिव्ह आणि संशयित अशा एकूण १९ रुग्णांवर खासगी व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- अतुल जयस्वालअकोला: राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाइन फ्लू या अत्यंत संसर्गजन्य आजाराने अकोल्यातही पाय पसरण्यास सुरुवात केली असून, जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ या नऊ महिन्यांच्या कालावधीत या आजाराने जिल्ह्यातील नऊ जणांचा बळी घेतला आहे. आरोग्य विभागाकडून आटोकाट प्रयत्न केले जात असतानाही या आजारावर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत असल्याचे उपरोक्त आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.एच १ एन १ या विषाणूंपासून होणारा स्वाइन फ्लू हा श्वसनसंस्थेचा आजार असून, तो अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे हवेवाटे त्याचा झपाट्याने प्रसार होतो. गत काही वर्षांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांंमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत होते. अकोला जिल्ह्यातही गत वर्षी स्वाइन फ्लूने धुमाकूळ घालत जवळपास २० जणांचा बळी घेतला होता. यावर्षी स्वाइन फ्लूची तीव्रता कमी असली, तरी आतापर्यंत शहर आणि जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ६७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ असून, आतापर्यंत सात रुग्ण या आजारामुळे दगावल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे.सद्यस्थितीत १९ रुग्णांवर उपचार सुरूपावसाळ्यात स्वाइन फ्लूची व्याप्ती वाढली असून, गत महिन्यात या आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले. सद्यस्थितीत स्वाइन फ्लूच्या पॉझिटिव्ह आणि संशयित अशा एकूण १९ रुग्णांवर खासगी व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये ८ रुग्ण पॉझिटिव्ह असून, ११ रुग्ण संशयित आहेत. सर्वोपचार रुग्णालयात सात रुग्ण दाखल असून, शहरातील दोन मोठ्या खासगी इस्पितळांमध्ये १२ रुग्ण असल्याची नोंद आहे.‘जीएमसी’मध्ये तपासणीची सुविधा नाहीपश्चिम विदर्भातील मोठे आरोग्य केंद्र असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात स्वाइन फ्लूची तपासणीची सुविधा नाही. स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे स्वॉब घेतल्यानंतर ते तपासणीसाठी नागपूर किंवा मुंबई येथे पाठविले जातात. यामुळे वेळ खर्ची पडतो.

 

टॅग्स :AkolaअकोलाSwine Flueस्वाईन फ्लू