शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोला : इमारतीचा भाग तोडण्यास नकार; मनपाच्या नगर रचना विभागात पाठविले गुंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:32 IST

अकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणार्‍या महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक मार्गावरील एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचा अतिक्रमित भाग तोडण्यास महापालिकेला साफ नकार दिला आहे. इथपर्यंतच न थांबता मनपाने कोणतीही कारवाई न करावी, यासाठी मनपाच्या नगररचना विभागात चक्क गावगुंड पाठवून दबावतंत्राचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देगोरक्षण रोडवरील ‘त्या’ बांधकाम व्यावसायिकाचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणार्‍या महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक मार्गावरील एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचा अतिक्रमित भाग तोडण्यास महापालिकेला साफ नकार दिला आहे. इथपर्यंतच न थांबता मनपाने कोणतीही कारवाई न करावी, यासाठी मनपाच्या नगररचना विभागात चक्क गावगुंड पाठवून दबावतंत्राचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची भाजपच्या लोकप्रतिनिधींनी गंभीर दखल घेतली असून, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या नेहरू पार्क चौक ते थेट संत तुकाराम चौकपर्यंतच्या डांबरी मार्गाची अतिशय दुरवस्था झाल्याचे लक्षात घेत आमदार गोवर्धन शर्मा यांनी शासनाकडे पाठपुरावा करून सिमेंट रस्त्यासाठी १४ कोटींची निधी मिळविला. नेहरू पार्क चौक ते महापारेषण कार्यालयापर्यंत रस्त्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले. यादरम्यान, महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतचा रस्ता अरुंद असल्यामुळे या ठिकाणी ‘बॉटल नेक’ निर्माण होण्याची शक्यता होती. बॉटल नेक दूर करण्यासाठी रस्त्यालगतच्या मालमत्ताधारकांच्या संमतीने मनपा प्रशासनाने जागा संपादित केली. यामध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस आदी पक्षाच्या नेत्यांसह स्थानिक मालमत्ताधारकांनी पुढाकार घेतल्यामुळेच रस्ता रुंदीकरणाला चालना मिळाली. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींचे मोजमाप करून रस्त्याला अडथळा ठरणारा भाग तोडण्याची कारवाई सुरू केली होती. अजय लहाने यांची बदली झाल्यानंतर ही कारवाई जवळपास ठप्पच पडली आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचा अतिक्रमित भाग तोडण्यास प्रशासनाला साफ मनाई केली आहे. प्रशासन कारवाई करेल, या विचारातून ‘त्या’ बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेच्या नगररचना विभागात काही गावगुंडांना पाठवून संबंधित अधिकार्‍यांवर दबावतंत्राचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. 

महापौर, सभापतींचे निर्देश विरले हवेत!महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौकपर्यंतच्या इमारतींचा काही भाग तोडण्याची कारवाई ठप्प पडली आहे. यामुळे रस्ता रुंदीकरणाचे कामही रखडले. हा प्रकार मनपाचे स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी महापौर विजय अग्रवाल यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर महापौर व सभापती यांनी इन्कम टॅक्स चौकात जाऊन इमारतींची पाहणी करीत प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही कारवाई होत नसल्याने महापौर विजय अग्रवाल, सभापती बाळ टाले यांचे निर्देश हवेत विरल्याचे चित्र समोर आले आहे.

मुदत नको, ठोस कारवाईची गरज!मागील अडीच महिन्यांपासून गोरक्षण रोडवरील मालमत्तांना हटविण्याची थातूरमातूर कारवाई सुरू आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी जाणीवपूर्वक वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. मनपात गावगुंडांना पाठवून दबावतंत्राचा वापर करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांना प्रशासनाने आता मुदत देण्यापेक्षा ठोस कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका