शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामात अकोला २२ व्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:19 IST

अकोला: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम योजनेत अकोला जिल्हा राज्यात २२ व्या क्रमांकावर आहे.

अकोला: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम योजनेत अकोला जिल्हा राज्यात २२ व्या क्रमांकावर आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आराखडा निश्चित केला आहे. त्यानुसार विविध उपक्रमही राबवले जात आहेत.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात नव्याने शौचालय बांधण्यासाठी कालमर्यादा ठरवून देण्यात आली. प्रत्येक गावातील लाभार्थींचे सर्वेक्षण करून त्यासाठी ३,८०० शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर शौचालय निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणात किती लाभार्थी शौचालय बांधण्यास तयार आहेत, त्याची यादी तयार झाली. लाभार्थीनिहाय निर्माण गट जोडण्यात आले. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांना फॉर्म देऊन युनियन बँकेकडून कर्ज घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली. शौचालय बांधण्यास तयार नसलेल्या लाभार्थींना नरेगामधून बांधकाम करणे, रोजगार सेवकासोबत समन्वय ठेवून काम करावे, १० जूनपर्यंत ३८०० शौचालयांची निर्मिती कोणत्याही परिस्थितीत करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. तरीही जिल्ह्यातील शौचालयांची कामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण असल्याने राज्यात अकोला जिल्हा २२ व्या क्रमांकावर आहे.विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ६५ ग्रामपंचायतींमध्ये १०९४ शौचालयांची निर्मिती करणे शिल्लक आहे. त्यासाठी २९ जुलैपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचेही निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते; मात्र तीही पूर्ण झाली नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील २१२ पैकी १४७ ग्रामपंचायतींमध्ये ही कामे पूर्ण झाली आहेत. तर ६५ ग्रामपंचायतींना ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली.

उद्दिष्ट अपूर्ण असलेल्या ग्रामपंचायतीतालुका             ग्रामपंचायती             शौचालयअकोला                 १०                             १५२अकोट                   २१                             ५७८बाळापूर                १०                              १०१बार्शीटाकळी         १४                                 ९८मूर्तिजापूर              ४                                   ४पातूर                     ०                                   0तेल्हारा                 ६                                  १६१

 

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान