शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात संततधार पाऊस

By admin | Updated: September 18, 2015 00:59 IST

खरीप पिकांना संजीवनी; रब्बी हंगामासाठी उपयुक्त.

अकोला: जिल्हय़ातील सातही तालुक्यात गुरुवारी दिवसभर संततधार पाऊस बरसला. या दमदार पावसामुळे जिल्हय़ातील खरीप पिकांना संजीवनी मिळाली असून, येत्या रब्बी हंगामासाठीदेखील हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापणार्‍या कडाक्याच्या उन्हामुळे वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे खरीप पिकांवर ताण आल्याने, जिल्हय़ात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात होती. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ आणि पावसाचे वातावरण होते. सकाळी ११ वाजतापासून अकोला शहरासह जिल्हय़ातील सातही तालुक्यात पाऊस सुरू झाला. अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. जिल्हय़ात सार्वत्रिक दमदार बरसलेल्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी इत्यादी खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. खरीप पिकांप्रमाणेच येत्या रब्बी हंगामासाठीदेखील हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. या पावसामुळे जमिनीतील वाढणारा ओलावा रब्बी हंगामातील पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे.

*अकोल्यात २६.0६ मि.मी. पाऊस!

 गुरुवारी दिवसभर अकोला शहरात दमदार पाऊस बरसला. रात्री ८.३0 वाजेपर्यंत शहरात २६.0६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. अतवृष्टीचा इशारा! गुरुवारी दुपारी १२ ते शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत या २४ तासात अकोला जिल्हय़ासह विदर्भात अतवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा नागपूर येथील हवामान वेधशाळेकडून देण्यात आला.

*धरणातील जलसाठय़ात अद्याप वाढ नाही

  जिल्हय़ातील जलसाठय़ात अद्याप कोणतीही वाढ झाली नाही. काटेपूर्णा धरणात २७ टक्के जलसाठा कायम असून, या धरणाच्या परिसरात केवळ २ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मोर्णा धरणाच्या परिसरात मात्र शून्य टक्के पाऊस आहे. या धरणाची पातळी ३७ टक्के आहे. उमा धरणाच्या परिसरात १0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या धरणात आजमितीस २८ टक्के जलसाठा आहे. निगरुणा धरणाचा जलसाठा ५१ टक्के असून, या परिसरात २७ मि.मी. पावसाच नोंद झाली आहे.