शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

अकोला रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट

By admin | Updated: May 29, 2014 01:13 IST

‘लोकमत’ने अकोला रेल्वे स्थानकाशी निगडित काही विषयांवर मंडळ वाणिज्य प्रबंधक एन. जी. बोरीकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत अकोला रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत.

अकोला : बुधवारी भुसावळ मंडळ अप्पर रेल्वे प्रबंधकांच्या आगमनापूर्वीच भुसावळ मंडळ वाणिज्य प्रबंधक एन. जी. बोरीकर, वरिष्ठ विभागीय अभियंता देवदास दत्ता, मुख्य वैद्यकीय अधिकारी पिंप्रीकर, हिंदी राज्यभाषा अधिकारी शुक्ला, आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी पी.एल. वर्मा हे अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. दरम्यान ह्यलोकमतह्णने अकोला रेल्वे स्थानकाशी निगडित काही विषयांवर मंडळ वाणिज्य प्रबंधक एन. जी. बोरीकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत अकोला रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. प्रश्न : अकोला रेल्वे स्थानकावर सीसी कॅमेरे केव्हा लागणार? उत्तर : सुरक्षेच्या दृष्टीने अकोला रेल्वे स्थानकावर सीसी कॅमेरे लावण्याची नितांत गरज आहे. सीसी कॅमेरे लावण्याची प्रक्रिया ही केंद्रीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक राज्यातील रेल्वे स्थानकांवर ते लावले जात आहेत. पहिल्या टप्प्यात राज्याच्या मेट्रो सिटीतील रेल्वे स्थानकांवर कॅमेरे लावण्यात आलेत. दुसर्‍या टप्प्यात अकोला रेल्वे स्थानकाचा क्रमांक लागणार आहे. रेल्वे प्रशासनामार्फत राज्यात दुसर्‍या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. प्रश्न : लगेज स्कॅनिंग मशीन धूळ खात पडली आहे. तिचा योग्य वापर कधी सुरू होणार? उत्तर : ज्या वेळी अकोला रेल्वे स्थानकावर लगेज स्कॅनिंग मशीन लावण्यात आली, त्या काळातील नियोजनाचा विचार करूनच ती लावण्यात आली होती. भविष्यात रेल्वे स्थानकाच्या रचनेत काही बदल होणार आहेत. दोन्ही दादर्‍यांच्या पायथ्याशी विशेष खोली निर्माण करण्यात येणार आहे. भविष्यात अकोल्यात एक नव्हे तर दोन लगेज स्कॅनिंग मशीन लावण्यात येणार आहेत. प्रश्न : वाहनतळाचे काय झाले? उत्तर : वाहनतळाचा प्रश्न अद्याप कायम आहे. नाशिकच्या कंत्राटदाराने कंत्राट सोडल्यानंतर वाहनतळाचे नवीन कंत्राट देण्यासाठी भुसावळ मंडळ अधिकार्‍यांनी कंत्राटाची रक्कम १0 टक्कय़ाने कमी केली होती. मात्र अद्याप रेल्वे प्रशासनाला वाहनतळासाठी नवीन कंत्राटदार मिळालेला नाही. येथील वाहनतळाचे कंत्राट घेऊन अर्थार्जन करण्यासाठी नवयुवकांनी समोर यावे, असे मी आवाहन करेन. प्रश्न : खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. त्यावर निर्बंध कसे लावणार? उत्तर : अधिकार्‍यांची पाठ फिरली की असे प्रकार होणारच; परंतु प्रवाशांनीदेखील जागरुक राहण्याची गरज आहे. एमआरपी, एक्सपायरी, त्यावरील कंटेन्ट पाहिल्याशिवाय प्रवाशांनी कुठलीच वस्तू खरेदी करू नये. या उपरही फसवणूक झाली असल्यास स्थानिक अधिकार्‍यांजवळ असलेल्या तक्रार रजिस्टरमध्ये नागरिकांनी तक्रार नोंदवावी. तक्रार लिखित स्वरूपात असल्यास त्याचा वेगळा प्रभाव पडतो. तक्रार रजिस्टरमध्ये नोंदविण्यात आलेल्या तक्रारीची दखल भुसावळ मंडळ अधिकार्‍यांमार्फत नक्कीच घेतली जाईल. प्रश्न : रेल्वे स्थानकावर बाल कामगारदेखील काम करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यावर आपण कारवाई कशी करणार? उत्तर : बाल कामगार कायद्यानुसार रेल्वे स्थानकावर बालकांना काम करण्यास परवानगी नाही. वय १२ असो वा १८ ते बालकामगारच. असे दृष्य आढळून आल्यास जागरुक नागरिकांनी ही बाब त्वरित स्थानिक रेल्वे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून द्यावी. त्यावर कारवाई केली जाईल. तक्रार केल्याशिवाय अशा विषयांसंदर्भात कारवाई करणे कठीण आहे. स्थानिक एनजीओ, बाल कल्याण अधिकार्‍यांनी देखील सतर्क रहावे.