शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशद्वाराच्या नामफलकात अडकले अकोला रेल्वेस्थानक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:55 IST

अकोला : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर योद्धा टिपू सुलतान या तीन महापुरुषांच्या नामफलकांत सध्या अकोला रेल्वेस्थानक अडकले आहे. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराचे परस्पर नामांतरण त्यांचे अनुयायी यांनी केले; मात्र रेल्वे प्रशासनाने अजूनही अधिकृतपणे तसे नाव जाहीर केलेले नाही.गत काही वर्षांपूर्वी अकोला रेल्वेस्थानकाच्या जीआरपी पोलीस ...

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकरांनंतर आता टिपू सुलतान

अकोला : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर योद्धा टिपू सुलतान या तीन महापुरुषांच्या नामफलकांत सध्या अकोला रेल्वेस्थानक अडकले आहे. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराचे परस्पर नामांतरण त्यांचे अनुयायी यांनी केले; मात्र रेल्वे प्रशासनाने अजूनही अधिकृतपणे तसे नाव जाहीर केलेले नाही.गत काही वर्षांपूर्वी अकोला रेल्वेस्थानकाच्या जीआरपी पोलीस ठाण्यालगत असलेल्या प्रवेशद्वारास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव एका रात्रीतून देण्यात आले. कमानीचे फ्लॅक्स बनवून रात्रीतून हे फलक लटकविण्यात आले. छत्रपतींच्या नावासोबत प्रेसिडंटच्या दुसºया हॉटेललगतच्या प्रवेशद्वारावरही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान रात्रीतून लावली गेली. अकोला रेल्वेस्थानकाच्या दोन्ही गेटला महापुरुषांचे नाव रात्रीतून अनुयायींनी दिले. दोन्ही फलकांची नोंद जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी घेतली. दरम्यान, अकोला रेल्वेस्थानकाचे प्रबंधक यांनी याबाबतची संपूर्ण माहिती भुसावळ डीआरएम यांच्याकडे पाठविली. अकोला रेल्वेस्थानकाचे दोन प्रवेशद्वार दोन महापुरुषांच्या नावात अडकलेले असताना, अकोट फैलच्या दक्षिण रेल्वेस्थानक प्रवेशद्वारास टिपू सुलतान यांचे नाव लावण्याचा प्रयत्न झाला. यंदा मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई केली. प्रवेशद्वाराचे नामफलक लागू दिले नाही. पोलिसांच्या कारवाईवर एका विशिष्ट समाजाचा रोष व्यक्त होत आहे. अकोला रेल्वेस्थानक विविध अनुयायी यांचे शक्तिपीठ झाले आहेत. जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांच्या भूमिकेबाबत अकोला रेल्वे प्रबंधकांनी अहवाल पाठविला आहे. आता भुसावळ डीआरएम कार्यालयाकडून कायदा व सुरक्षिततेबाबत काय निर्देश येतात, अधिकृतपणे नावे जाहीर होतात की फलक काढले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.- अकोला रेल्वेस्थानकाच्या कोणत्याही प्रवेशद्वाराचे नाव अधिकृ तपणे दिलेले नाही. यासंदर्भात पोलिसांनी केलेल्या कारवाईची नोंद आम्ही वरिष्ठांकडे पाठविली आहे. आता पुढील निर्देश आल्यानंतर काय ते ठरविता येईल.-जी.बी. मीणा, स्टेशन मास्तर, रेल्वे स्टेशन, अकोला.