शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Akola: अकोला मार्गे पुणे-अमरावती-पुणे एसी चेयर कार विशेष एक्स्प्रेस शुक्रवारपासून

By atul.jaiswal | Updated: November 9, 2023 19:03 IST

Special Express Train: आगामी सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते अमरावती या दोन स्थानकांदरम्यान शुक्रवार १० नोव्हेंबरपासून विशेष एसी चेअर कार विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

- अतुल जयस्वाल अकोला - आगामी सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते अमरावती या दोन स्थानकांदरम्यान शुक्रवार १० नोव्हेंबरपासून विशेष एसी चेअर कार विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला मार्गे धावणार असलेल्या या विशेष एक्स्प्रेसच्या ११ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अप व डाऊन अशा एकूण १८६ फेऱ्या होणार असून, या गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्र. ०११०१ पुणे-अमरावती एक्स्प्रेस शुक्रवार १० नोव्हेंबर ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पुणे स्थानकावरून दररोज सकाळी ११:०५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता अमरावती येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०११०२ अमरावती-पुणे एक्स्प्रेस शनिवार, ११ नोव्हेंबर ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अमरावती स्थानकावरून दररोज रात्री १०:५५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे. अप व डाऊन मार्गावरच्या या गाड्यांना उरूळी, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव, मनमाड, चाळीसगांव, काजगांव, पाचोरा, जळगांव , भुसावळ, मलकापुर, शेगांव, अकोला, बडनेरा स्थानकांवर थांबा असणार आहे. एलएचबी कोचसह धावणाऱ्या या विशेष रेल्वेला १७ डबे असून, द्वितीय श्रेणी चेयर कार १३, एसी चेयर कार श्रेणी ०१, स्लीपर श्रेणी ०१, द्वितीय श्रेणी व एसएलआर ०२ अशी संरचणा असणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAkolaअकोला