शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : नेकलेस रोडच्या रूंदीकरणासाठी मालमत्ताधारक सरसावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 14:57 IST

अकोला : नेकलेस रस्त्याच्या रूंदीकरणाआड येणारे अतिक्रमण हटविण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारक सरसावले असून, रस्त्यालगतची दुकाने, प्रतिष्ठाणे यांचा अतिक्रमीत भाग हटविण्याच्या कामाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्दे मनपा प्रशासनाने मालमत्ताधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी २० मे पर्यंतची मुदत दिली आहे. नेहरू पार्क चौक ते सिव्हिल लाइन चौक, रतनलाल प्लॉट चौक ते दुर्गा चौकापर्यंत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी नेकलेस रस्त्याची पाहणी केल्यानंतर रस्त्यालगतच्या मालमत्ताधारकांसोबत महापालिकेत बैठक आयोजित केली होती.

अकोला : नेकलेस रस्त्याच्या रूंदीकरणाआड येणारे अतिक्रमण हटविण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारक सरसावले असून, रस्त्यालगतची दुकाने, प्रतिष्ठाणे यांचा अतिक्रमीत भाग हटविण्याच्या कामाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. नझुल शिटनुसार आरक्षित असलेल्या रस्त्याची संपूर्ण जागा मोकळी केली जाणार असून, मनपा प्रशासनाने मालमत्ताधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी २० मे पर्यंतची मुदत दिली आहे.महापालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी शासनाकडून निधीचा ओघ सुरूच आहे. प्राप्त निधीतून अकोला शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण तसेच एलईडी पथदिव्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येते. सिव्हिल लाइन ते मुख्य पोस्ट आॅफिस, दुर्गा चौक ते अग्रसेन चौक, धिंग्रा चौक ते सिटी कोतवाली ते थेट किल्ला चौक, अशोक वाटिका ते सरकारी बगिचा, श्रीवास्तव चौक ते डाबकी रोड, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉटपर्यंत मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. नेहरू पार्क ते थेट संत तुकाराम चौकापर्यंत होणाऱ्या गोरक्षण रोडचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याच धर्तीवर आता नेहरू पार्क चौक ते सिव्हिल लाइन चौक, रतनलाल प्लॉट चौक ते दुर्गा चौकापर्यंत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, या रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणाऱ्या मालमत्तांचे अतिक्रमण हटविण्यासाठी मनपा प्रशासन सक्रिय झाले आहे. मध्यंतरी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी नेकलेस रस्त्याची पाहणी केल्यानंतर रस्त्यालगतच्या मालमत्ताधारकांसोबत महापालिकेत बैठक आयोजित केली होती. रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यासाठी मालमत्ताधारकांना २० मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. रस्त्याचे रूंदीकरण होणारच, हे गृहीत धरून नेकलेस रस्त्यालगतच्या मालमत्ताधारकांनी स्वत: पुढाकार घेत दुकाने, प्रतिष्ठाणांचा अतिक्रमीत भाग स्वत: काढून घेण्यास प्रारंभ केल्याचे चित्र दिसून येत आहे.मनपाच्या ‘मार्किंग’मुळे मार्ग सोपामहापालिकेच्या नगररचना विभागाने सिव्हिल लाइन चौक ते रतनलाल प्लॉट चौक ते दुर्गा चौकपर्यंत रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या मालमत्तांना ‘मार्किंग’ केली आहे. मालमत्तांवर लाल रंगाचे निशाण केल्यामुळे मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्ता हटविण्याचा मार्ग सोपा झाला आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका